आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात दाखविले काळे झेंडे!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचार रॅलीला काळे झेंडे दाखविल्यामुळे कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी सध्या बुंदेलखंड दौर्‍यावर आहेत. उरई येथे ते पोहचताच काही विरोधकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. काळे झेंडे दाखविणारे लोक भाजपचे कार्यकर्ते अथवा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे समर्थक असावे, असा संशय कॉंग्रेसला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचा प्रचार पाचव्या टप्प्यात सुरू आहे. विदेशी बॅंकांमधील 'काळा पैसा' परत आणण्यासाठी भाजप सरकारवर अशा प्रकारच्या दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यातील मागासलेल्या भागाची उपेक्षा केली आहे. येथील जनतेला रोजगार हमी योजनेपासून वंचित ठेवले असल्याचाही आरोप राहूल गांधी यांनी बुंदेलखंड येथील सभेत केला आहे.

राहुलचा आदेश मिळाल्यास प्रचार -प्रियंका गांधी
युपी निवडणूकः राहुल गांधींची प्रतिष्‍ठा पणाला
'सोनिया आणि राहुल गांधींमध्‍ये मतभेद'