आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर्डांची कोलांटउडी, 'नरेंद्र मोदी राष्ट्रीय संत नाही, राष्ट्रीय कलंक'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केल्यामुळे काँग्रेसचे खासदार विजय दर्डा चांगलेच गोत्यात आले आहेत. रविवारी मोदी यांचा त्यांनी ‘गुजरात का शेर’ आणि ‘राष्‍ट्रीय संत’ अशा शब्दांत गौरव केला. यामुळे दर्डा यांना पक्षश्रेष्ठींच्या रोषाला बळी पडावे लागणार असल्याचे संकेत पक्षातून मिळाले होते. गुजरातच्या प्रभारींकडून या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर दर्डांनी कोलांटउडी मारत सोमवारी मोदींना 'राष्ट्रीय संत नाही, राष्ट्रीय कलंक' म्हटले आहे.
राष्‍ट्रसंत तरुणसागरजी महाराजांच्या प्रेरणेने देण्यात येणारा तरुण क्रांती पुरस्कार 2012 स्वीकारण्यासाठी दर्डा अहमदाबादेत आले होते.
गुजरात का शेर आया : दर्डा
महाराष्‍ट्रातून राज्यसभेवर खासदार असलेले दर्डा पुरस्काराला उत्तर देत असतानाच मोदींचे आगमन झाले. ते आल्यामुळे चुळबूळ सुरू झाल्याचे पाहून दर्डा म्हणाले, इतनी हलचल क्यों हैं.... गुजरात का शेर आया है! त्यासरशी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दर्डा पुढे म्हणाले, या ठिकाणी चार राष्‍ट्रसंत आहेत. मुनी तरुणसागर महाराज, बाबा रामदेव, राष्‍ट्रसंत मोदी आणि चौथा मी स्वत:!
मोदींनी हात जोडले....
मोदी मंचाकडे येत होते. दर्डांकडून सुरू असलेले गुणगान कानावर पडताच ते सावध झाले. दर्डांनी त्यांना ‘गुजरात का शेर’ संबोधले तेव्हा मोदी मंचावर होते. दर्डांचे विचार ऐकून त्यांनी हात जोडून मूक प्रतिक्रिया दिली.
नरेंद्र मोदींची स्तुती, विजय दर्डा गोत्यात; हायकमांडने मागविला अहवाल
गुजरात दंगलीप्रकरणी दोषी आढळल्यास भरचौकात फाशी द्या : नरेंद्र मोदी
'नरेंद्र मोदी हे सडलेले फळ, या गेंडयाला बाहेर फेका'
नरेंद्र मोदी-संजय जोशी पोस्टरयुद्ध मुंबईतही
नरेंद्र मोदी होते अबू जुंदलच्‍या निशाण्‍यावर