आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police Rescure Minor Sex Workers From Gb Road Red Light Area

प्रेमविवाह करून पुण्यातील अल्पवयीन मुलीस विकले कुंटणखान्यात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील एका अल्पवयीन मुलीला कर्नाटकातील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला दिल्लीतील एका कुंटणखान्यात विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी एका समाजसेवी संस्थेच्या मदतीने तिची सुटका केल्यानंतर ही माहिती उघड झाली.
पोलिसांनी शक्तीवाहिनी आणि रेस्क्यू फाउंडेशनच्या मदतीने जीबी मार्गावरील कुंटणखान्यात छापेमारी करून सहा अल्पवयीन मुलींची सुटका केली. त्यात पुण्यातील तरुणीचा समावेश होता. तिला कर्नाटकातील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. त्यानंतर तिच्याशी विवाह करून तिला दिल्लीतील एका कुंटणखान्यात तीस हजार रुपयांमध्ये विकले होते.
गेल्या आठ महिन्यांपूर्वी या अल्पवयीन तरुणींची दिल्लीत विक्री झाली होती. एनजीओने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी रात्री कुंटणखाना क्रमांक 40 आणि 51 वर छापेमारी करून पीडित मुलींची सुटका केली. त्यांना तळघरात डांबून ठेवले होते. यातील चार मुली पश्चिम बंगालमधील, एक नेपाळ तर एक महाराष्ट्रातील आहे.
पोलिस ठाण्‍यातच तरुणीवर बलात्कार; बाहेर पहारा देण्यात पोलिस होते गुंग!
मित्राच्या मदतीने पित्यानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार
शिक्षिकेच्या पतीचा शिक्षकाच्या पत्नीवर बलात्कार