आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department of agriculture and cooperation spent rs 21 lakh on tea and snacks

पवारसाहेबांच्या अधिका-यांनी चहापानावर उडविले एका वर्षात २१ लाख रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे कृषी आणि सहकार विभागातील दिल्ली कार्यालयाचे रोजचा चहा नाश्त्याचा खर्च साडेपाच हजारापेक्षा जास्त आहे. हा खुलासा झाला आरटीआय कार्यकर्ता अफरोज आलम साहिल याने मागविलेल्या माहितीच्या अधिकारातंर्गत.
अफरोज साहिल यांनी कृषी मंत्री शरद पवार यांचा हवाई प्रवास, मंत्रालयातील उपस्थिती आणि दैनंदिन कामकाजासह बैठकीची माहिती मागवली होती. याचबरोबर कार्यालयातील खर्चाची माहिती मागवली होती. शरद पवार यांच्या उपस्थितीबाबत अफरोदला माहिती मिळाली नाही पण त्यांच्या मंत्रालयातील खर्चाबाबत मात्र माहिती मिळाली.
कृषी मंत्रालयाच्या निगडीत असलेल्या कृषी आणि सहकार विभागातील आरटीआय कार्यकर्ता अफरोजला उत्तर देताना माहिती दिली आहे की, गेल्या चार वर्षात या मंत्रालयाने ७८ लाख ५४ हजार ५२६ रुपये चहा व नाश्त्यासाठी खर्च केले आहेत. त्यात २० लाख ७० हजार रुपये आर्थिक वर्ष २०११-१२ या दरम्यान झाला आहे. म्हणजेच कृषी आणि सहकार विभागात रोज साडेपाच हजार रुपयापेक्षा अधिक खर्च चहा आणि नाश्त्यावर खर्च झाला आहे. तसेच राष्ट्रीय ऑईलसीड आणि व्हेजीटेबल ऑयल डेबलपमेंट बोर्डाने सांगितले की, गेल्या पाच वर्षात कृषी मंत्रालयाच्या कार्यालयात ८० हजार ४५६ रुपये इतका खर्च झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे- प्रणवदा भेटीदरम्यान शरद पवारांची \'TEA DIPLOMACY\'ची इच्छा
कमी पाऊसः पवार म्‍हणतात चिंतेचे कारण नाही
टेलिकॉम मंत्रिगटाच्या प्रमुखपदाचा शरद पवारांचा राजीनामा