आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election Commission Notification On President Poll Likely By Mid june

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जूनमध्‍ये राष्‍ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी होण्‍याची शक्‍यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- निवडणूक आयोगाकडून राष्‍ट्रपती निवडणुकीसाठी जूनच्‍या मध्‍यात अधिसूचना जारी होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यानंतर देशातील सर्वोच्‍च पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल.
राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी संपणार आहे. गेल्‍या राष्‍ट्रपती निवडणुकीची अधिसूचना ही 13 जूनला जारी करण्‍यात आली होती, असे आयोगाच्‍या एका वरिष्‍ठ अधिका-याने सांगितले. यावेळीदेखील आयोग याच तारखेच्‍या आसपास अधिसूचना जारी करण्‍याची शक्‍यता आहे.
राष्‍ट्रपती निवडणुकीसंदर्भात 41 चेकलिस्‍ट (परीक्षण सूची) असतात. त्‍याच्‍यावर आधीच कार्य सुरू झाले आहे. राष्‍ट्रपती निवडणुकीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अद्यापही अनेक जणांचे नाव राष्‍ट्रपतींच्‍या पदासाठी चर्चिले जात आहे.
संयुक्‍त पुरोगामी आघाडी आणि मुख्‍य विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने अजूनही संभावित उमेदवारांचे नाव घोषित केलेले नाही. परंतु, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभेचे माजी अध्‍यक्ष पीए संगमा यांनी आपल्‍या उमेदवारीची आधीच घोषणा केली आहे.
कॉंग्रेसकडून विद्यमान उपराष्‍ट्रपती हामिद अन्‍सारी किंवा अर्थ मंत्री प्रणव मुखर्जी यांच्‍यापैकी एकाला उमेदवारी मिळण्‍याची शक्‍यता आहे. संगमा यांच्‍या उमेदवारीला सध्‍या तामिळनाडू आणि ओडिशाच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी सार्वजनिकरित्‍या पाठिंबा घोषित केला आहे.
ओबामा राष्ट्राध्यक्ष बनू शकतात तर मी का नाही? - संगमा
राष्‍ट्रपती निवडणुकीसाठी संगमा बंडाच्‍या पावित्र्यात