आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fight Is For Changing System, Not Power: Team Anna

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता संसदेत जाणार जनआंदोलन, निवडणूक लढवणार टीम अण्णा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टीम अण्णाच्या उपोषण मंचावरून ते राजकारणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने आज माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.
राजकीय पक्ष निर्माण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून अण्णा हजारे यांनी सांगितले की. "१९७५ साली सेनेमधून परत आलो. आज ३५ वर्ष झाले, ही लढाई सुरु आहे. या लढाईत ४०० पेक्षा जास्त भ्रष्ट अधिकारी घरी गेले. व्यवस्थेत परिवर्तन व्हावे यासाठी ही लढाई आहे. मी निर्णय घेतला होता की, कोणताही राजकीय पक्ष काढणार नाही, निवडणूक लढवणार नाही, परंतु देशातील जनतेसाठी मी तयार झालो.
व्ही. के. सिंग आणि देशातील वरिष्ठ लोकांनी माझ्याकडे अपील केली. त्यामुळे आम्ही उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. देशातील जनतेला राजकीय पर्याय देण्यासाठी संपूर्ण देशात मी फिरणार आहे. जनता जागृत झाली तर, मला पूर्ण विश्वास आहे की, जनता नवीन राजकीय पर्यायावर विचार करेल आणि भ्रष्ट नेत्यांना घरी पाठवेल.
अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले की, ते राजकारणात उतरणार आणि देशाला नवा राजकीय पर्याय देणार. तसेच दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले सेनाप्रमुख व्ही. के. सिंग यांनी अण्णा हजारे यांना राजकारणात उतरण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, सध्या देशात 1975 सारखी स्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी हे आवश्यक आहे की, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनी राजकारणात यावे.
सध्या देशात खूप समस्या आहेत, ज्यामध्ये सर्वात मोठी भ्रष्टाचार ही समस्या आहे. अनुशासन आणि प्रशासन कमकुवत होत चालले आहे. महागाईने लोकांचे कंबर मोडले आहे. असे वाटत आहे की आपण दिशाहीन झालो आहोत. त्यांनी हे ही सांगितले की, आपत्तीच्या काळात सेना खूप चांगले काम करते, मग सरकार का नाही करीत. जंतर-मंतरवर उपस्थित असेलेल्या जनतेला संबोधित करतना ते म्हणाले की, "जी जिद्द सेनेजवळ आहे तीच जिद्द तुमच्याजवळ आहे."त्यामुळे तुम्ही मनात आणले तर हे चित्र बदलू शकते.
याआधी टीम अण्णाचे सदस्य गोपाल राय यांनी निवडणूकीत उतरण्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, २०१४च्या निवडणुकीत जर आपले लोक निवडून आले तर सध्याच्या सरकारमधील १५ भ्रष्ट मंत्री जेलमध्ये असतील.
भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषणाचा मार्ग सोडून... अण्णा राजकारणात
टीम अण्णाने राजकारणात उतरावे का?
अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!