आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DISTURBING: फिजाच्या मृतदेहाची अखेरची छिन्न-विछिन्न छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाचे माजी उपमुख्‍यमंत्री चंद्रमोहन यांच्‍यासोबत विवाह करुन चर्चेत आलेली फिजा उर्फ अनुराधा बाली हिचा गुढ मृत्‍यू झाला आहे. तिचा मृतदेह सोमवारी सकाळी मोहाली येथील निवासस्‍थानी आढळून आला. तिचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, ही आत्महत्या आहे की तिचा मर्डर झाला याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण तिच्या घरात काही दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. तसेच घराचा दरवाजाही उघडा होता. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू आहे की आत्महत्या की मर्डर हे सांगता येत नाही. तिच्या घरात आत्महत्येची चिठ्ठी वगैरे काहीही सापडले नाही. फिजाचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडला आहे.
चंद्रमोहन हे हरियाणाचे मुख्‍यमंत्री भजनलाल यांचे पुत्र आहेत. तिच्‍या प्रेमात आकंठ बुडालेल्‍या चंद्रमोहन यांनी धर्मपरिवर्तन करुन तिच्‍याशी विवाह केला होता. विवाह करण्‍यासाठी चंद्रमोहन हे चांद मोहम्‍मद झाले. तीदेखील धर्मपरिवर्तन करुन मुस्लिम झाली होती. परंतु, काही दिवसांनी चंद्रमोहन यांनी तिला सोडून दिले. यानंतर ती अतिशय निराश झाली होती. आईच्‍या निधनानंतर ती घरी एकटीच राहत होती. निराशेतूनच तिने आत्‍महत्‍या केली असावी, असा संशय आहे. फिजाचा मृत्‍यू नेमका कशामुळे झाला, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्‍यामुळे शवविच्‍छेदन अहवालानंतरच मृत्‍यूचे नेमके कारण स्‍पष्‍ट होईल.