आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या हव्यासापायी तब्बल सहावेळा सुनेचा गर्भपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - मुलाच्या हव्यासापायी एक दोन नव्हे तर तब्बल सहावेळा गर्भपात करण्याची वेळ एका महिलेवर आली आहे. तिच्यावर ही वेळ तिच्या सासरच्या मंडळींनीच आणली. या सुनेसोबत झालेला अमानवीय व्यवहार आणि त्याला जबाबदार असलेल्या गर्भजल परीक्षा सेंटर्स या विरोधात तिने अभियान सुरु केले आहे.
येथील वस्त्रपूरमध्ये राहाणारी अमिषा भट्ट (३६) यांनी पति आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच समाजात सुरु असलेल्या या दुष्कृत्याविरोधात माहितीच्या अधिकाराला हत्यार बनवत युद्ध सुरु केले आहे.
अमिषा यांनी बडोदा, आणंद, आणि पंचमहाल या जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत त्यांच्या गर्भपाताची आणि अशाच इतर घटनांची माहिती मागण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांना मिळालेल्या माहितीमध्ये, ज्या दवाखाण्यात त्यांचा गर्भपात करण्यात आला तिथे त्याचे कोणतेच रेकॉर्ड उपलब्ध नाही. मात्र इतर प्रकरणांची माहिती उघड होत आहे. यामुळे सोनोग्राफी सेंटर्सची पोलखोल होत आहे.
या सर्व माहितीमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की, प्री कन्सेपशन अँड पी नटाल डायग्नोस्टिक तंत्रज्ञानसारखा कायदा कुचकामी ठरत असून, वंशाला दिवा हवा या हव्यासापायी स्त्री भ्रूण हत्या सर्रास सुरु आहेत.