आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतिका प्रकरण : कांडाविरुद्ध पुरावे सापडेनात! सोनियांनी मागवला रिपोर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हवाई सुंदरी गितिका आत्महत्या प्रकरणी हरयाणाचे माजी मंत्री गोपाल गोयल कांडा फरार झाला आहे. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी एमडीएलआर कंपनीच्या व्यवस्थापकिय संचालक अरुणा चड्डा यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसचे(वायव्य) उपायुक्त पी. करुणाकरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांडाला मंगळवारी नोटिस पाठवून बुधवारी हजर होण्यास सांगितले होते. कांडाचे वकिल भारत अशोक विहार पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी तीन दिवसांचा अवधी मागितला. मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला. त्यानंतर कांडा फरार झाला. चौकशी प्रक्रियेत सहभागी न झाल्यास कांडाविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात येईल. एमडीएलआर कंपनीच्या एमडी अरुणा चड्डाला चौकशीनंतर अटक करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कांडाचा अन्य एक कर्मचारी मनदीपची चौकशी करण्यात आली. त्याच्या नावावर घेतलेल्या मोबाइल सीम कार्डच्या माध्यमातून कांडा गितिकाला बोलत होता. मनदीप साक्षीदार असल्याने त्याची अटक करण्यात आली नाही. एमडीएलआर कंपनीमधून काही दस्तऐवजांची जमवाजमव केली जात आहे. गितिकाचा शव विच्छेदन अहवाल अद्याप पोलिसांना मिळाला नाही.
दहा लोकांची चौकशी : गितिका आत्महत्याप्ररकणी
आतापर्यंत दहा जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पी. करुणाकरन यांनी दिली. यासंदर्भात अंकित अहलुवालियाचीही चौकशी झाली आहे.
PHOTOS : गितीका व मंत्री गोपाल कांडांची कौटुंबिक छायाचित्रे उघड