आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद- गुजरात दंगलप्रकरणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाही. न्यायालयाने बुधवारी त्यांना दोन झटके दिले. एकीकडे न्यायालयाने त्यांना अवमानना नोटीस बजावली तर दुसरीकडे विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल एक महिन्याच्या आत झाकिया जाफरी यांना देण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना तन्वीर जाफरी यांनी या अहवालामुळे मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असे म्हटले आहे. एसआयटीचा अहवाल सुमारे 50 हजार पानांचा असल्यामुळे न्यायालयाने मोदी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना अवमानाची नोटीस
गुजरात उच्च न्यायालयाने मोदी सरकारला नोटीस बजावली आहे. वर्ष 2002मध्ये गुजरात दंगलीतील पीडितांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश देऊनही त्यावर कारवाई न केल्यामुळे ही नोटीस बजावली. याप्रकरणी 56 याचिकाकर्त्यांनी अर्ज दाखल केले होते.
नरेंद्र मोदीच 2014मध्ये भाजपचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.