आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोषी असल्यास फाशी द्या : मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गोध्रा अग्निकांडानंतर उसळलेल्या दंगलींबाबत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दंगलींबाबत माफी मागण्यास नकार देत, मी दोषी असेन तर फासावर लटकवा, असे आव्हान त्यांनी दिले. मोदी यांनी पहिल्यांदाच उर्दू वृत्तपत्राला मुलाखत दिली.
समाजवादी पार्टीचे नेते आणि संपादक शाहिद सिद्दिकी यांनी ही मुलाखत घेतली. मोदी म्हणाले की, माफी मागायची कशासाठी हेच मी 2004 पासून म्हणत आलो आहे. माझ्या सरकारने दंगली घडवल्या असतील तर भरचौकात फासावर लटकवावे. म्हणजे शंभर वर्षे तरी असे करण्याची हिंमत कोणी करणार नाही. वास्तविक दंगलीत सहभाग असल्याच्या प्रकरणात एसआयटीने याआधीच क्लीनचिट दिली आहे. मोदींचा इंटरव्हय़ू घेण्याच्या मुद्दय़ावर महेश भट्ट व सलमान खानचे वडील सलीम खान यांच्याशी चर्चा केल्याचे सिद्दिकी यांचे म्हणणे आहे.
मुलाखतीची वैशिष्ट्ये - उर्दू वृत्तपत्राला मुलाखत देऊन दुसर्‍या समाजात आपले म्हणणे पोहोचवण्याचा प्रयत्न
समाजवादी पार्टीच्या नेत्याशी बोलल्यामुळे या पक्षाशी जवळीक असल्याचे संकेत. अर्थात शाहिद यांनी त्यास नकार दिला.
मागील वर्षी सद्भावना उपोषण करून मोदी यांनी प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केला होता.
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच पुन्हा एकदा गोध्रा जळीतकांडाचा मुद्दा लोकांसमोर आणणे.