आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यबळ विकास मंत्रालयाची वेबसाइट हॅक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: फेसबुक व इतर सोशल नेटवर्कींग साइटवर टाकण्यात येणाºया आक्षेपार्ह मजकुराबाबत दूरसंचार मंत्रालयावर चौफेर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची वेबसाइट हॅक करून अनुदान मंजूर करण्याच्या नावाखाली महाराष्ट्रासह विविध राज्यांतील अनेक संस्थाचालकांंकडून पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक अनेक दिवसांपासून सुरू होती व त्याबाबत देशव्यापी रॅकेट कार्यरत असल्याचा अंदाज आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या योजना मंजूर केल्याच्या नावाखाली बनावट लेटर पॅड, स्टॅम्पचा वापर करून संस्थांना अनुदान दिल्याचे भासवून अनेक संस्थाचालकांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाइटवर संस्थाचालकांसाठी देण्यात आलेल्या सूचना विभागात अनेक अनावश्यक सूचनांची जंत्री जोडण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास राज्य मंत्रालयाच्या कार्यालयाच्या नावावर लेटर पॅड तयार करण्यात आले आहे. त्याचा बनावट वापर करून संस्थाचालक व शाळा मालकांकडून पैसे उकळणाºयांचे देशव्यापी रॅकेट अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. त्यांचा गोरखधंदा गुप्तपणे सुरू होता व या व्यवहारातून शिक्षणचालकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज आहे.
साक्षर भारत योजनेत बनवेगिरी : ‘दिव्य मराठी नेटवर्क’च्या तपासणीत असे आढळून आले की, मंत्रालयाच्या वेबसाइट साक्षर भारत योजनेत निवड झालेल्या शाळांची वेगळे पेजच टाकण्यात आले आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंडमधील 30 पेक्षा जास्त शाळांची या योजेत निवड झाल्याचे दर्शवण्यात आले आहे. या शाळांना ग्रांट देण्यात आल्याचे भासावून त्यांच्यापैकी अनेकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. प्रत्यक्षात साक्षर भारत योजनेत शाळांची निवड व त्यासाठी ग्रांट देण्याची कुठलीच तरतूद नाही.