आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am In The Dark As You Are, Pranab Mukherjee On Presidential Nomination

मला माहिती नाही, माझ्या उमेदवारीबाबत मीही तुमच्यासारखाच अंधारात- प्रणव मुखर्जी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- मला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळणार असल्याबाबत मलाही काहीही माहिती नाही. मी ही तुमच्यासारखाच अंधारातच आहे, असे मत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.
रवींद्रनाथ टागोर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ढाक्यात पोहचल्यानंतर पत्रकारांनी मुखर्जी यांनी छेडले असता ते म्हणाले, माझ्या उमेदवारीबाबत मला काहीही माहिती नाही. मीही तुमच्यासारखाच अंधारात आहे.
राष्ट्रपतीपदाबाबत मुखर्जी यांचे नाव सध्या सगळ्यात पुढे असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसनेही याबाबत कणतेही वृत्त फेटाळले नाही. करुणानिधी, शरद पवार यांच्यासह ममता बनर्जी यांनी त्यांच्या नावाला सहमती दिल्याचे समजते. मात्र प्रणव मुखर्जी यांनीच मी राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक नसल्याचे म्हटले होते. तसेच या सर्व माध्यमांच्या वावड्या असल्याचे सांगत त्यावर मत व्यक्त करण्यास नकार दिला होता.
राष्ट्रपती निवडणूक: प्रणवदा फेव्हरिट, करुणानिधी, जयललितांचाही पाठिंबा
राष्ट्रपती निवडणूक : दिल्लीत राजकीय भेटीगाठींना उधाण व चर्चेलाही उत
राष्ट्रपती निवडणूक रोमांचक वळणावर : तुमच्या पंसतीचा उमेदवार कोण?