आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Soniya Gandhi Is Pm Then Pawar Not In Congress Cabinet Says Tripathi

सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या तर, पवारांनी मंत्रिपद स्वीकारले नसते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परत एकदा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलून धरला आहे. २००४ मध्ये सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या तर, शरद पवार यांनी मंत्रिमंडळात प्रवेश केला नसता. असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याने केला आहे.
एनसीपीचे प्रवक्ते डीपी त्रिपाठी यांनी सांगितले की, २००४ मध्ये केंद्रात काँग्रेस नेतृत्वाखालील युपीएला बहुमत मिळाल्यानंतर शरद पवार यांनी स्पष्ट केले होते की, जर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर ते सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत. या स्थितीत सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेस बाहेरून पाठींबा देईल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या आगामी "टर्निग पॉईंट्स' या पुस्तकात सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान होण्याबाबत दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर त्रिपाठी यांनी वरील वक्तव्य केले आहे.
सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची तयारी केली होती - कलाम
कलामांच्या 'टायमिंग\'वर शिवसेनेची कडाडून टीका