आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE : पंतप्रधानांनी तिरंगा फडकविला, भाषण सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. आता ते देशाला उद्देशुन भाषण करत आहेत. पंतप्रधान म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. वैश्विक मंदीचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मान्सूनने दिलेल्या हुलकावणीमुळे अडचणींमध्ये भरच पडली आहे. मात्र, देशात अन्न-धान्याचा मुबलक साठा आहे.
पंतप्रधानांनी यावेळी पुढील पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
१५ ऑगस्ट उद्यानामध्ये अनेक शाळकरी मुले उत्साहात बसलेली आहेत.
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची ही नववी वेळ आहे.
जवळपास ३० मिनीटांच्या भाषणात पंतप्रधानांनी युपीए2 सरकारच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच युपीए1 मध्ये सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांचाही उल्लेख त्यांनी केला.

आपले मत
पंतप्रधानांच्या भाषणावर तुम्ही तुमचे मत खाली दिलेल्या कॉमेंटस बॉक्समध्ये नोंदवू शकता. देशाच्या नावे तुमचा संदेशही divyamarathi.comच्या माध्यमातून जगभर पोहचवू शकता.
अभिभाषण : संसद हाच जनतेचा आत्मा- राष्ट्रपती
देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा- राष्ट्रपती
चैतन्यशील भारत बनवूया! (अग्रलेख)