आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Top 5 Most Wanted Terrorist Like Abu Hamza

PHOTOS: भारताला हवे आहेत हे टॉप फाईव्ह मोस्ट वॉन्टेड दहशतवादी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड सईद जबीउद्दीन उर्फ अबु हजामाला ‍दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्‍ट्रीय
विमानतळावर पोलिसांनी अट केली. त्याला पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दहशतवादी अबु हजामा हा महाराष्‍ट्रातील बीड येथील रहिवासी आहे. सध्या अटकेत असलेल्या क्रुरकर्मा अजमल कसाबला अबुने हिंदी भाषा शिकविल्याचाही आरोप आहे. शस्त्रांचा सौदागर म्हणूनही दहशतवाद्यांमध्ये अबु प्रसिद्ध आहे. भारत आणखी पाच खुंखार दहशतवाद्यांच्या शोधात आहे. हाफिज मो. सईद, इलियास कश्मिरी, दाऊद इब्राहिम, मो. मसूद अझहर आणि छोटा शकील यांचा समावेश आहे.
टॉप फाईव्ह मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना पाहा छायाचित्रांत...