आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian President Pranab Mukherjee Speech Of Nation By Before Independence Day

देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा- राष्ट्रपती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भ्रष्टाचाराला विरोधाच्या नावाखाली अनागोंदी माजली तर लोकशाहीच्या मूळ व्यवस्थेला धक्का पोहोचू शकतो, असा इशारा देतानाच संसद हाच जनतेचा आत्मा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी केले.
भ्रष्टाचाराच्या विरोधात देशात समाजसेवक अण्णा हजारे, रामदेव बाबा यांची आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांनी या आंदोलनांचा समाचार घेतला. संसद ही भारताच्या लोकशाहीचा आत्मा आहे. 66 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून बोलताना मुखर्जी यांनी हा इशारा दिला. महामारी, प्लेग, भ्रष्टाचार यांच्या विरोधातील आक्रोश समजण्यासारखा आहे. तो एक काळ होता. लोकांचा संयम ढळला होता, परंतु संसदेसारख्या लोकशाही संस्थेवर हल्ला कदापिही सहन करता येणार नाही. आपल्या भाषणात त्यांनी हजारे किंवा रामदेव बाबा यांचा उल्लेख टाळला. संसद ही घटनेचे दृश्य रूप आहे. त्याला तडा गेला तर घटनेची तत्त्वे देखील शाबूत राहणार नाहीत. ते लोक (हजारे-रामदेव बाबांचे आंदोलन) घटनेची तत्त्वे आणि जनता यांच्यात हस्तक्षेप करू लागली आहेत. काही नष्ट होईल याची भीती नाही, परंतु त्यांची उभारणी करून पुन्हा त्या संस्था बळकट कशा होतील, हा सवाल आहे. म्हणूनच स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे काम संसद करते, हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु स्थानिक पातळीवर अशी आंदोलने झाली तर अनागोंदी माजण्याची भीती असते. लोकशाहीत एक प्रक्रिया असते. आपण सर्व विजयी होतो. त्याचबरोबर पराभूत देखील होत असतो. संसदेचे स्वत:चे एक सजीव कॅलेंडर असते. त्याची एक लय असते. कधीकधी तो बेसूर होतो. मात्र लोकशाहीत एक दिवस न्यायाचा असतो. त्यालाच आपण निवडणूक म्हणतो. म्हणूनच संसद ही लोकशाहीचा आत्मा आहे, असे मुखर्जी म्हणाले.
भ्रष्टाचार हा विकासासाठी मारक
भ्रष्टाचार संपायला हवा : प्रतिभाताई
भ्रष्टाचार रोखण्यासाठी अन्य देशांसोबत करार