आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबिने नेपाळमध्‍ये लष्‍करच्‍या दहशतवादी शिबिरात घेतले प्रशिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः मुंबई हल्‍ल्‍यातील एक प्रमुख सूत्रधार जबिउद्दीन अन्‍सारीने आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे. लष्‍कर-ए-तैय्यबाचे नेपाळमध्‍ये ट्रेनिंग कॅम्‍प असून त्‍याला तिथेच प्रशिक्षण देण्‍यात आले होते, अशी माहिती त्‍याने चौकशीदरम्‍यान दिल्‍ली पोलिसांसमोर उघड केली.
अबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्‍सारी सध्‍या दिल्‍ली पोलिसांच्‍या विशेष पथकाच्‍या ताब्‍यात आहे. चौकशीदरम्‍यान त्‍याने बरीच माहिती उघड केली आहे. त्‍याने सांगितले की, लष्‍करने नेपाळमध्‍ये दहशतवादी शिबिर बनविले होते. त्‍यात त्‍याच्‍यासह महाराष्‍ट्रातील 4 आणि गुजरातच्‍या एकाला प्रशिक्षण देण्‍यता आले होते. असलम काश्मिरी असे प्रशिक्षण देणा-याचे नाव होते. काश्मिरी हा जम्‍मू आणि काश्मिरमधील राजौरी भागतील रहिवासी आहे. त्‍यानेच जबिचा परिचय 'जिहाद' या शब्‍दाशी करुन दिला होता. गुजरात दंगलीनंतर तो काश्मिरीच्‍या संपर्कात आला होता. जमात-उद-द‍वाचा म्‍होरक्‍या हाफिज सईदचा मुंबई हल्‍ल्‍यात थेट सहभाग होता आणि हल्‍ल्‍याच्‍यावेळी कराची येथील नियंत्रण कक्षात तो उपस्थित होता, असे जबिउद्दीनने यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे.
अबू जुंदलचा साथीदार फसीहला सौदी अरबमध्‍ये अटक
मुंबईतील आमदार निवासात थांबला होता मास्टर माईंड अबु जुंदल!
26/11 च्या हल्ल्यावेळी जबीउद्दीनसोबत होता हाफिज सईद
गिलानी म्‍हणतात, \'हाफिज सईद विरोधात पुरावे नाहीत\'