आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jabiuddin Ansari Is Getting More Luxury Treatment

मटण, बिर्याणी आणि मोगलाई लज्‍जतः जबिचा कसाबपेक्षाही शाही पाहूणचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः मुंबईवरील हल्ल्याचा दोषी अजमल कसाब हा कारागृहात राजेशाही थाट उपभोगत होता. परंतु, या हल्‍ल्‍याचा मास्टरमाइंड असलेल्‍या अबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्‍सारी याची कसाबपेक्षा जास्‍त ऐष सुरु आहे. कसाब तर केवळ प्‍यादा होता. त्‍यामुळे त्‍याच्‍या सिनिअरची त्‍याच्‍यापेक्षा जास्‍त काळजी घेण्‍यात येत असल्‍याचे उघडकीस आले आहे.
अजमल कसाबवर सरकारने तब्‍बल 16 कोटींपेक्षा जास्‍त रुपये खर्च केले आहेत. परंतु, जबिची कसाबपेक्षाही बडदास्त शाही आहे. दिल्ली पोलिसांनी खास एसी खोलीत सोय केली आहे. ‘खान मार्केट’मधून त्याच्यासाठी मटण, बिर्याणी आणि मोगलाई डिश मागवल्या जात आहेत. कोलकात्याच्या 'टेलिग्राफ'ने हे वृत्त दिले आहे.
ही माहिती देताना एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, जबिकडून माहिती काढण्‍यासाठी हा मार्ग अवलंबल्‍या गेला आहे. 'थर्ड डिग्री'पेक्षा या मार्गाने तो बोलू लागला आहे. अबूचा मूड चांगला राहावा आणि त्याच्याकडून अनेक कटांचा उलगडा व्हावा म्हणूनच आम्ही हा फंडा अवलंबला आहे. एवढेच नाही तर अबूभोवती पहार्‍यावर असलेल्‍या पोलिसांनाही त्‍याच्‍यासोबत चांगले राहण्‍याच्‍या आणि चेष्टामस्करी करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत असे टेलिग्राफच्या वृत्तात म्हटले आहे.
सुरुवातीला अबूला इतर कैद्यांप्रमाणे दालरोटी देण्यात आली. परंतु, त्‍याने ती खाल्‍ली नाही. हे जेवण तो खातही नव्‍हता. तसेच काही बोलायलाही तयार नव्हता. नंतर बिर्याणी मिळायला लागल्यापासून तो मोकळेपणाने बोलतोय. त्याचा रागही कमी झालाय, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला.

‘२६/११’नंतर केले कराचीत लग्न
‘२६/११’च्या हल्ल्यानंतर आपण कराचीत लग्न केल्याची माहिती अबूने चौकशीत दिली आहे. बीडमधील शाळेतल्या आठवणी तसेच बायको, मुलांबाबतही तो भरभरून बोलत असतो.
जबिने नेपाळमध्‍ये लष्‍करच्‍या दहशतवादी शिबिरात घेतले प्रशिक्षण
पाकिस्तानी ISIच्या मेजरने पुरविली होती कसाबला एके-47 ची काडतुसे
चौकशीतून पर्दाफाश : नाशिकवर हल्ल्याची जबीची योजना होती
मुंबईतील आमदार निवासात थांबला होता मास्टर माईंड अबु जुंदल!