आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसआय मेजर सूचना देत होता, जबिउद्दीन अन्सारीने दिली माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुंबई हल्ल्याच्या वेळी (26/11) आयएसआयचा अधिकारी कंट्रोल रूममध्ये बसून कसाबसह इतर अतिरेक्यांना सूचना देत होता, अशी माहिती जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदालने दिल्ली पोलिसांना दिली. मेजर समीर असे त्याचे नाव आहे. यापूर्वी डेव्हिड हेडलीनेही मेजर समीरचे नाव घेतले होते. हेडली सध्या अमेरिकेत अटकेत आहे. मुंबई हल्ल्यानंतर वाढता दबाव पाहून पाकिस्तानने कंट्रोलरूम नष्ट केल्याचेही जबीने म्हटले आहे.

दरम्यान, जबिउद्दीनच्या पोलिस कोठडीत तीस हजारी कोर्टाने गुरुवारी 15 दिवसांची वाढ केली. 20 जुलैपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांचे विशेष पथक योग्य चौकशी करत आहे. त्यांची चौकशी पूर्ण होऊ द्यायला हवी. याचा फायदा राष्ट्रीय तपास संस्थेला आणि अन्य राज्यांतील तपास संस्थांना होईल, असे मुख्य महानगर दंडाधिकारी विनोद यादव यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील आमदार निवासात थांबला होता मास्टर माईंड अबु जुंदल!
अबू जिंदाल हा अबू हमजा नव्हेच!
जबीउद्दीनचा झाला अबू जिंदाल