आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनरेगा घोटाळा : सीबीआय चौकशी हाच एकमेव मार्ग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी पुन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना पत्राद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मनरेगा योजनेतील घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा एकमेव मार्ग राहिल्याचे त्यांनी या पत्रातून म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारने मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंडप्रमाणे केंद्राशी समन्वय ठेवून काम करण्याचाही सल्ला दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सरकारमधील सुंदोपसुंदी समोर येत असल्याचे जाणकारांना वाटते. केंद्राला बसपा बाहेरून पाठिंबा देत असली राजकीय लढाईत काँग्रेस बसपा नंबर एकचा शत्रू मानत असल्याचेच यावरून स्पष्ट होते. जयराम यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पुढे म्हटले आहे की, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा व छत्तीसगड सारखी राज्ये ही ग्रामीण विकास मंत्रालयाशी अधिक चांगल्या प्रकारे समन्वय ठेवून काम करीत आहेत. यातील काही राज्यांनी तर प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यातही यश मिळविले आहे.
उत्तर प्रदेशात केंद्राने सहभाग घेऊ नये, यासाठी कोणतेही कारण नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात माझा कोणताही राजकीय उद्देश नाही, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असेही जयराम यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारमधील गोंधळाची स्थिती दाखविण्यासाठी आपण हा पत्र प्रपंच करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.