आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काळे फेकणा-याने केला होता अण्णा आणि भाजपचा प्रचार'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर काळी शाई फेकणा-या कामरान सिद्दिकी याने अण्णा हजारे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला होता, असा आरोप कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
कामरान हा भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांचा समर्थक असल्याची चर्चा आहे. मिडीयातून येत असलेल्या बातम्यांनुसार कामरान याने राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत १९ मार्च २००९ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
या कार्यक्रमात अनेक नव्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. या कार्यक्रमाची छायाचित्रे टीव्ही वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहेत. यातील एका छायाचित्रात कामरान आणि राजनाथ सिंह हे जवळ जवळ उभे असल्याचे दिसत आहे. कामरान याने २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राजनाथ सिंह यांचा जोरदार प्रचार केला होता, असे सांगण्यात येत आहे.
कामरानने अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता आणि त्याने राजनाथ सिंह यांच्यासाठी काम केले होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केल्यामुळे भाजप अडचणीत आला आहे. ‘दिग्विजय सिंह हे जाणीवपूर्वक भडक वक्तव्ये देत आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता नाही', अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी दिली.
छायाचित्रांतून पाहा - रामदेव बाबांवर कुणी टाकली शाई ?
रामदेव बाबा यांच्या तोंडावर काळं फेकलं
काळे फेकण्यामागे आरएसएसचा हात