आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejariwal Controvercial Statement Agains Member Of Parliament

केजरीवाल यांचे मानसिक संतुलन बिघडलेः 'राजद'ची टीका, हक्‍कभंग आणणार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः टीम अण्‍णाचे सदस्‍य अरविंद केजरीवाल यांनी खासदारांबाबत केलेल्‍या वक्तव्‍यामुळे वादळ निर्माण झाले आहे. संसदेमध्‍ये खुनी आणि बलात्‍कारी सदस्‍य बसले आहेत, या त्‍यांच्‍या वक्तव्‍यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. केजरीवाल यांनी संसदेचा अपमान केल्‍याची टीका त्‍यांच्‍यावर सुरु झाली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्‍याविरोधात संसदेच्‍या आगामी अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात आरजेडीतर्फे हक्‍कभंग प्रस्‍ताव मांडण्‍यात येणार आहे. केजरीवाल यांनी संसदेच्‍या सदस्‍यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्‍य केले होते. त्‍याला आरजेडीचे सरचिटणीस राम कृपाल यादव यांनी प्रत्‍युत्तर देताना केजरीवाल यांचे मानसिक संतुलन बिघडल्‍याची टीका केली आहे. केजरीवाल यांनी संसदेसोबतच देशातील निवडणूक प्रक्रीयेचाही अपमान केला आहे. केजरीवाल यांना मनोरुग्‍णालयात दाखल केले पाहिजे, असे यादव म्‍हणाले.
एकीकडे केजरीवाल यांच्‍या वक्तव्‍यावरुन राजकीय पक्षांकडून तीव्र निषेध होत आहे. तर दुसरीकडे रामदेव बाबा यांनी केजरीवाल यांच्‍या वक्तव्‍याला पाठींबा दिला आहे. केजरीवाल यांनी गाझियाबाद येथील सभेमध्‍ये खासदारांवर टीका करताना संसदेमध्‍ये खुनी, बलात्‍करी आणि गुन्‍हेगार असल्‍याचे वक्तव्‍य केले होते.
टीम अण्‍णाने उत्तर प्रदेशात स्‍वच्‍छ प्रतिमा असलेल्‍या उमेदवारांना निवडून देण्‍याबाबत जन जागृती मोहिम राबविली आहे. त्‍यासाठी ग्रेटर नोयडामध्‍ये एक जाहीर सभा घेण्‍यात आली होती. त्‍यात भाषण करताना केजरीवाल यांनी खळबळजनक आरोप खासदारांवर केले. ते म्‍हणाले, संसदेमध्‍ये दरोडेखारे, बलात्‍कारी, खुनी लोक गेले आहेत. त्‍यांनी संसदेचा ताबा घेतला आहे. अशा तत्‍वांना संसदेतून बाहेर काढण्‍यासाठी लढा लढावा लागेल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
राजकीय पक्षांवर टीका करताना ते म्‍हणाले, सर्वच राजकीय पक्ष भ्रष्‍ट आहेत. देशाला लुटण्‍यासाठी त्‍यांना निवडणूकीत विजय हवा आहे. कोणत्‍याही पक्षाला देशाच्‍या विकासाची चिंता नाही. भाजपदेखील भ्रष्‍ट पक्ष आहे. मध्‍य प्रदेश, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्‍ये भाजपने भ्रष्‍टाचार थोपविण्‍यासाठी काहीच केले नाही.
केजरीवाल यांच्‍या या वक्तव्‍यानंतर राजकीय वर्तुळात टीम अण्‍णाविरोधात पुन्‍हा एकदा संताप निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने केजरीवाल यांच्‍या वक्तव्‍यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. खासदार संजय निरुपम म्‍हणाले, संसदेत गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीचे सदस्‍य आहेत. परंतु, सर्वच सदस्‍य असे आहेत, असा याचा अर्थ होत नाही. कोणीही संसदेच्‍या प्रतिष्‍ठेला अशा प्रकारे तडा देऊ शकत नाही. असे वक्तव्‍य म्‍हणजे संसदेविरुद्ध हक्‍कभंग आहे.
टीम अण्णांच्या सभेचे आयोजन केले संघाने?
स्‍वयंसेवकांचे योगदान अण्‍णा का स्‍वीकारत नाहीत? सरसंघचालक भडकले
केजरीवाल, बेदी, शिसोदिया, भूषण हे स्वतःच बरबटलेले - बाळासाहेब ठाकरे