आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूर- बेपत्ता झालेली नर्स भंवरी देवी हिच्या तपासासाठी सीबीआय वेगाने काम करीत आहे. लूणीचे आमदार मलखान सिंह यांना सीबीआय माजी मंत्री महिपाल मदेरणा यांच्या झालामंड येथील फार्महाऊसवर तपासासाठी घेऊन गेली होती. याबाबत सांगितले जात आहे की, मलखान हा भंवरीबरोबर नेहमी या फार्महाऊस येत आहे. काही वेळा त्यांच्याबरोबर महिपाल मदेरणाही असत.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, भंवरी झालामंडच्या आदर्शनगरमधील फार्महाऊसवर नेहमीच यायची. मग मदेरणा जोधपूर असो की जयपूरमध्ये. जोधपूरमध्ये मदेरणा असले की, ते फार्महाऊसवर जायचे तसेच मलखानही तेथे यायचा.
मदेरणा फार्महाऊसवर नसतानाही मलखानसिंह आणि भंवरी तेथे येऊन राहायचे.
त्याचमुळे बुधवारी मलखानसिंहला सीबीआय या फार्महाऊसवर घेऊन गेली होती. सीबीआयला संशय आहे की, मलखान व मदेरणाची सेक्स सीडी येथेच बनविली गेली असावी. त्यामुळे मलखानसिंहला सीबीआय तेथे नेऊन कॅमेरयाची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र तेथे सर्वत्र कुलूप लावलेले दिसले. याबाबत सुरक्षा रक्षकांना विचारले गेले असता त्यांनी सांगितले की, याची चावी लीला मदेरणा यांच्याकडे आहे व त्या जयपूरमध्ये राहत आहेत. त्यानंतर सीबीआय मलखानसिंहला पुन्हा सर्किट हाऊसवर परत घेऊन आली. त्यानंतर मलखानसिंहला ३१ डिसेंबरपर्यंत सीबीआयच्या रिमांडमध्ये पाठवून दिले.
दरम्यान, मलखान सिंह आणि भंवरी यांच्या मुलींचे रक्ताचा नमुना डीएनए तपासासाठी दिल्ली कार्यालयात पाठविला आहे.
'मी तर नावालाच नवरा होतो; मलखानच्या प्रेमात बुडाली होती भंवरी'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.