आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayawati Announces List Of 403 Candidates For Up Poll

मायावतींचे यावेळीही सोशल इंजिनिअरींग, 403 उमेदवारांची यादी जाहीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊः उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाजवादी पक्षाच्‍या 403 उमेदवारांची नावे जाहीर केली. यावेळीही मायावतींचा सोशल इंजिनिअरींगचे समीकरण या यादीतून दिसून आले. गेल्‍या निवडणुकीमध्‍येही त्‍यांचा हाच फॉर्म्‍युला वापरला होता.
आज मायवती यांचा 56वा वाढदिवस आहे, हे निमित्त साधून मायावती यांनी ही यादी जाहीर केली. बहुजन समाजवादी पक्षाकडून अनुसुचीत जाती आणि जमातीसाठी 88 जागा देण्यात आल्या आहेत. तर ओबीसी करिता 113 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुस्लिमांसहित अल्पसंख्यांना 85 जागा दिल्या आहेत. तसेच उच्चवर्णियांना 117 जागा देण्यात आल्या आहेत. या 117 जागांपैकी 74 जागा ब्राह्मण समाजासाठी जाहीर करण्यात आल्या आहे.
गेल्या निवडणुकांपासून मायवती यांनी सोशिअल इंजिनिअरींगचा फॉर्म्युला वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी , ‘ हाथी नही गणेश है। ब्रह्मा, विष्णु, महेश है। ’ अशा घोषणा त्यांच्या पक्षातर्फे देण्यात येत होत्या. याचा फायदा त्‍यांना मिळाला होता. तेच धोरण मायावतींनी यावेळीही अवलंबले आहे.
आयोगाला चंदीगढमधील पंजा का दिसला नाही? मायावतींचा सवाल
काँग्रेसचे डोके फिरल्‍यामुळेच 'ह्त्ती' पैसे खातांना दिसतोः मायावतींचा घणाघात