आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊः उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी अतिशय साधेपणाने वाढदिवस साजरा केला. निवडणुकीमुळे आचार संहिता लागू आहे. त्यामुळे कोणत्याही वादामध्ये न अडकता त्यांनी हा निर्णय घेतला. परंतु, वाढदिवासाची भेट म्हणून कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही मायावतींनी टीका केली.
मायावतींचा आज 56 वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्या मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करतात. परंतु, आचारसंहितेमुळे त्यांनी यावेळी ते टाळले. निवडणूक आयोगाने विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हत्तीच्या पुतळ्यांना झाकण्याच्या निर्णयावर मायावतींनी टीका केली. कांशीराम यांच इच्छेनुसार पुतळे लावण्यात आले होते. आयोगाला यावर आक्षेप होता तर त्यांना चंदीगढमधील पार्कमध्ये लावलेले पंजे का दिसले नाही? आयोगाने आरएलडीचे हॅण्डपंपही हटविले पाहिजे. आयोगाने चुकीच्या माहितीच्या आधारावर नोटीस दिली. आम्ही त्यावर उत्तर दिल्याचेही मायावतींनी सांगितले.
मायावतींचे यावेळीही सोशल इंजिनिअरींग, 403 उमेदवारांची यादी जाहीर
मायावती सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री
मायावती व हत्तींचे पुतळे झाकणार, निवडणूक आयोगाचे आदेश
उत्तर प्रदेश विभाजनाचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे मायावती नारा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.