आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावती सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती या सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्याकडे 87.27 कोटींची मालमत्ता असून मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याजवळ केवळ 6.9 लाखांची संपत्ती आहे.
उत्तर प्रदेशसह ज्या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तेथील मुख्यमंत्र्यांनी शपथपत्राद्वारे संपत्तीचे विवरण सादर केले आहे. नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू)ने या शपथपत्रांच्या आधारे केलेल्या विश्लेषणातून मायावती याच सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरल्या आहेत. मायावतींकडे 87.27 कोटींची संपत्ती असल्याचे शपथपत्राद्वारे स्पष्ट झाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे फौजदारी खटला असणारे ते एकमेव मुख्यमंत्री आहेत.