आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे डोके फिरल्‍यामुळेच 'ह्त्ती' पैसे खातांना दिसतोः मायावतींचा घणाघात

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- काँग्रेसचे डोके फिरले आहे,त्यामुळेच हत्ती पैसे खातो असे त्यांना वाटते अशा शब्दात मायावतींनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या वतीने मुस्लीम,क्षत्रिय आणि वैश्य समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मायावतींनी मुस्लीमांना आरक्षण देण्याची मागणीही केली.
केंद्र सरकारने गरीबांसाठी पाठवलेला पैसा लखनऊमध्ये बसपाचा हत्ती खातोय अशी टीका काँग्रेस सरचिटणीस राहूल गांधी यांनी केली होती. या टिकेमुळे संतापलेल्या मायवातींनी आज बसपाच्या मेळाव्यात पलटवार केला आहे. काँग्रेसचे डोके फिरले आहे. त्यामुळेच हत्ती (बसपा) पैसे खात असल्याचे त्यांना दिसते. 40 वर्षांच्या राजवटीत काँग्रेसने लोकांचे भले केले नाही. आता पाच वर्ष सत्ता द्या नशीब बदलतो असा दावा करुन ते लोकांकडे मते मागत आहेत. अशी घणाघाती टिका मायावतींनी यावेळी केली. मुस्लिमांना आरक्षण दिले पाहीजे अशी मागणी करून ओबीसींना देण्यात येणाºया 27 टक्के आरक्षणाच्या कोट्यात वाढ करुन मुस्लिमांचा समावेश करण्यात यावा.त्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात यावी असे मायावती म्हणाल्या. परदेशात दडवलेला काळा पैसा आणून त्यापैकी 50 टक्के पैसा उत्तर प्रदेशच्या विकासासाठी खर्च करण्यात येईल असे काँग्रेसने जाहीर करावे असे आव्हान त्यानी दिले.पंरतु काँग्रेस नेत्यांचीच यामध्ये संशयास्पद भूमिका असल्याने ते अशी घोषणा करणार नाहीत असे मायावती म्हणाल्या.
दरम्यान,मायावतींची ही टिका हास्यास्पद असल्याचे सांगून मायावती आपला पक्ष आणि अल्पसंख्यांकांबद्दल नैराश्यातून अशी टिका करतात अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केली आहे.