आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात 'भ्रष्टाचाराच्या' २६ कंपन्या; राहुल गांधींनी दिली साथ - उमा भारती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - मायावती यांचे भाऊ आनंद कुमार हे २६ कंपन्या चालवितात असा घणाघाती आरोप करीत भाजपा नेत्या उमाभारती यांनी त्या कंपन्यांची सूचीही पत्रकार परिषदेत जरी केली. या सर्व कंपन्या भ्रष्टाचाराच्या पैशावर पोसल्या गेल्याचे सांगत उमा भारती यांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. उत्तर प्रदेशातील या भ्रष्टाचाराला राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षच कारणीभूत आहे. मायावती सरकार उत्तर प्रदेशाची लूट करीत असताना केंद्रातील कॉंग्रेस सरकार पाहत राहिली, असेही त्या म्हणाल्या.
आनंद कुमार यांच्या कंपन्या गेल्या चार वर्षात भ्रष्टाचाराच्या पैशाने कशा पोसल्या गेल्या आणि बेहिशेबी संपत्ती कशी निर्माण झाली, याचा आलेखच भाजपचे राष्ट्रीय महासचिव किरीट सोमय्या यांनी मांडला.
मायावतींच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी सोमवारी लखनौ येथील पक्षाच्या मुख्यालयापासून डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत 'न्याय मार्च' काढण्यात आला. पक्षाचे महासचिव किरीट सोमय्या, महिला आघाडी प्रमुख प्रेमलत कटियार आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला उमाभारती आणि इतर नेत्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर त्यांना मार्चसाठी परवानगी देण्यात आली.
मायावती मंत्रिमंडळाचा निर्णय: उत्तर प्रदेशचे चार तुकडे पाडण्याचा घाट
राहुल, राग केंद्रावर काढा; मायावती यांचा युवराजांवर हल्ला
मायावती-जयराम रमेश यांच्यात जुंपली