आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayawati Upset After Center Returned Proposal To Divide Up

उत्तर प्रदेश विभाजनाचा प्रस्‍ताव फेटाळल्‍यामुळे मायावती नाराज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशचे चार भागांत विभाजन करण्याचा प्रस्ताव केंद्राकडून फेटाळण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री मायावती नाराज झाल्या आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारची नियत योग्य दिसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पूर्वांचल, बुंदेलखंड, अवध व पश्चिम प्रदेश असा मायावतींचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर घटनात्मकदृष्टीने कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु युपीए सरकारने जाणून बुजून जनतेची दिशाभूल करत आहे. या संदर्भातील प्रस्ताव हा संसदेद्वारेच मंजूर केल्या जातो. राज्य सरकारची यात कोणतीही घटनात्मक जबाबदारी नसते, असे त्या म्हणाल्या.राज्याच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी त्याला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते. अशा प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी राष्ट्रपती संबंधित राज्याच्या विधीमंडळाचे मत मागवतात. लोकांची भावना लक्षात घेऊनच आम्ही राज्य विभाजनाचा प्रस्ताव मांडला व तो केंद्र सरकारकडे पाठवला होता, असे मायावती म्‍हणाल्‍या.