आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mdmk Chief Waiko Oppose To Kudanukalam Atomic Project

कुडानकुलम बंद करण्याची वायको यांची मागणी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कुडानकुलम प्रकल्पामुळे हजारो जीव धोक्यात आल्याचे कारण पुढे करत माजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर आणि एमडीएमके प्रमुख वायको यांनी प्रकल्प बंद करण्याची मागणी केली आहे.
सच्चर आणि वायको यांचा कुडानकुलम प्रकल्पविरोधी चळवळीला पाठिंबा आहे. फ्रेंड ऑफ कुडानकुलम अँटी न्यूक्लिअर मुव्हमेंटने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही मागणी केली. अणुऊर्जा देशातील ऊर्जेची गरज भागवू शकत नाही, असे ते म्हणाले. देशातील अणु प्रकल्पातील विजेचा वाटा केवळ 2.8 टक्के आहे. आगामी काही दशकांमध्ये तो 7 टक्क्यांपर्यंत जाईल. जपानसारख्या आधुनिक तंत्रज्ञान असणा-या देशाला आण्विक दुर्घटना टाळता आल्या नाहीत. भारताने का जोखीम स्वीकारावी? असा सवाल वायको यांनी केला.
प्रकल्प उभारताना स्थानिक नागरिकांच्या मतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रकल्पविरोधकांना शांत करण्यासाठी सरकार त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या कलमाखाली (कलम 124-अ) गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप वायको यांनी केला. विद्युत पुरवठ्यासाठी सरकारने अपारंपरिक स्रोताचा वापर करावा. भारतातील 71 टक्के ऊर्जेची गरज अपारंपरिक स्रोतापासून भागवता येऊ शकते, असे एमडीएमके प्रमुख वायको यांनी स्पष्ट केले.