आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकवरील मित्राशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणा-या महिला आमदाराला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहटी- फेसबुकवरील मित्राच्या प्रेमात पडलेल्या व ल ग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणा-या आसाममधील विवाहित महिला आमदार रुमी नाथ हिला पोलिसांनी काल अटक केली.
याबाबत सांगितले जात आहे की, दोन वर्षाच्या मुलींची आई असलेली व बारखोला विधानसभा मतदारसंघातील ३२ वर्षीय आमदार रुमी नाथ हिने इस्लाम धर्म स्वीकारुन एका मुस्लिम तरुणांशी लग्न करुन शेजारील बांगलादेशात गेली होती. आता तिला अटक झाल्याने हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. ज्या तरुणांशी रुमीने विवाह केला आहे त्याचे नाव जॉकी जाकिर आहे. जॉकी तिला फेसबुकवर भेटला होता. त्यानंतर त्यांची ओळख व ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले होते. त्यानंतर त्यांनी मागील महिन्यात इस्लाम पद्धतीने विवाह केले होता.
विवाहानंतर हे दोघे बांग्‍लादेशमध्‍ये गेल्‍याची माहिती तिने स्‍वतःच दिली. विवाहाची छायाचित्रे काही स्‍थानिक टीव्‍ही चॅनल्‍सवर सर्वप्रथम झळकली होती. परंतु, सर्वप्रथम तिने विवाहचे वृत्त खोटे असून छायाचित्रेही बनावट असल्‍याचा दावा केला होता. परंतु, महिनाभरानंतर तिने विवाह झाल्‍याचे मान्‍य केले. तिने स्‍वतः विवाहाचा व्हिडिओ प्रसारमाध्‍यमांना पाठविला. आसामचे एक मंत्री शामिल सिद्दीकी अहमद यांनी विवाहाची तयारी केल्‍याचे त्‍यातून स्‍पष्‍ट होते. रुमीचे पहिले पती राकेश सिंह यांनी सिद्दीकी यांच्‍या‍विरोधात पत्‍नीच्‍या अपहरणची तक्रार मुख्‍यमंत्री तरुण गोगोई यांच्‍याकडे केली. त्‍यानंतर पोलिसांमध्‍येही तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई झाली असावी. दरम्यान, रुमीने मात्र आता झाकीर हे तिचे कायदेशीर पती असल्‍याचे सांगितले आहे. ती लवकरच घटस्‍फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे. दुस-या विवाहापूर्वी मी इस्‍लाम धर्म स्विकारला होता. त्‍यामुळे हिंदू विवाह कायदा तिला लागू होत नाही, असे तिने स्‍पष्‍ट केले. मुलीच्‍या ताब्‍यासाठीही ती अर्ज करणार आहे.
Video : आसाममधील विवाहित महिला आमदाराने केले पळून जाऊन लग्न