आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing Bollywood Starlet Laila Khan Is Dead: Police

बॉलिवूड अभिनेत्री लैला खानच्या ठावठिकाण्याचे गूढ कायम? अज्ञातस्थळी की खून?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्‍मू/मुंबई- दहशतवाद्यांशी संबंध असल्‍याचा आरोप असलेली बॉलिवूड अभिनेत्री लैला खानचा खून झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. परवेझ टाकने चौकशी दरम्‍यान खुलासा करून सनसनी माजवली आहे. लैला खान आणि तिच्‍या कुटुंबियातील काही लोकांना मुंबई जवळ गोळया घालून ठार मारण्‍यात आल्‍याचे त्‍याने म्‍हटले आहे. यापूर्वी जम्‍मू पोलिसांनी केलेल्‍या चौकशीत परवेझ अहमद टाकने लैला दुबईमध्‍ये दाऊद इब्राहीम बरोबर असल्‍याचे म्‍हटले होते. त्यामुळे लैला खानबाबत जाणून -बुजून अशी अफवा तर पसरवली जात नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण तिच्या वडिलांनीही सांगितले आहे की, तिचा खून झाला नसावा व ती अज्ञातस्थळी असावी.
लैला खानला मारण्‍याची आसिफ उर्फ सोनू या शार्पशूटरला सुपारी देण्‍यात आली होती. त्‍याने लैला तिच्‍या दोन बहिणी, आई आणि भावाला 9 जानेवारी 2011 रोजी मारून त्‍यांना गाडून टाकल्‍याचे परवेझने जम्‍मू पोलिसांना सांगितले. गेल्या अकरा महिन्यापासून लैला बेपत्ता आहे. त्यामुळे कालच लैलाचे वडील नादीर शाह पटेल यांनी मुंबईमध्‍ये ओशिवारा पोलिस ठाण्‍यात आपल्‍या मुलीचे अपहरण करण्‍यात आल्‍याचा गुन्‍हा दाखल केला आहे. गेल्‍या 11 महिन्‍यांपासून बेपत्ता असलेल्‍या लैलावर दहशवाद्यांशी संबंध असल्‍याचा आरोप करण्‍यात येत होता. तसेच मागील काही महिन्यात लैला मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत दुबईत ठुमके लावत असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले होते. आताही ती दुबई किंवा अज्ञातस्थळी असावी, असे बोलले जात आहे. कारण ती इगतपुरीहून नेपाळमार्गे थेट दुबईला गेल्याचे सांगण्यात आले होते. दहशतवाद्यांशी संबंध असल्याने तिचा भारतात शोध घेतला जात आहे. तिच्या मागावार भारतातील एटीएसचे अधिकारी असल्याने तिचा खून करण्यात आला असल्याचा कांगावा तर करण्यात येत नाही ना अशी शंकेची पाल चुकचुकते आहे. त्यामुळे बेपत्ता लैलाच्या ठावठिकाणाचा मागील काही महिन्याप्रमाणे गूढ कायम आहे.
जवळचे लोक तिला कसे मारतील?- लैलाचा खून तिच्याजवळ असणा-या एक कोटी रुपयांच्या दागिण्यासाठी व तेवढीच रोकड असल्याने केली असल्याचा दावा परवेझ टाकने केला आहे. दरम्यान परवेझ हा तिचा जवळच्या नातेवाईकांमधील असून तो तिच्यासह कुटुंबियांची हत्या कशी करेल, असा प्रश्न पडत आहे. तसेच याआधी त्याने लैला दुबईत दाऊदजवळ असल्याचे सांगितले होते. भविष्यात दाऊदबाबत मुंबई पोलिसांनी वाटाघाटी करताना दहशतवाद्यांशी संबंधित असलेली लैलामुळे आपल्याला गोवण्यात येऊ नये यासाठीही दाऊद तिला अज्ञातस्थळी ठेऊ शकतो. किंवा तिला मारले असल्याचे जाहीर करायला सांगत असावा, अशीही शक्यता आहे. किंवा अशीही एक शक्यता आहे की, दाऊदने तिचा वापर झाल्यानंतर तिला ठार मारण्यास सांगितले असावे. सध्या तरी पैशासाठी किंवा दागिण्यासाठी तिची हत्या, खून झाला असावा, असे वाटत नाही. एक तर तिचा खून झाला असेल तर तो दाऊदच्या सांगण्यावरुन झाला असावा किंवा दाऊदनेच तिला मध्य आफ्रिकेसारख्या मागास देशात अज्ञातस्थळी ठेऊन तिचा खून झाला असल्याची अफवा पसरवण्याचा आदेश काढला असावा. याबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल मात्र परवेझ टाकच याबाबत अधिक भाष्य करु शकतो.
EXCLUSIVE : दाऊदच्या इशा-यांवर नाचत आहे बॉलिवूड अभ‍िनेत्री लैला
पाक अभिनेत्री लैला खान लष्कर-ए-तोयबाच्या ताब्यात
पीओकेमध्‍ये दहशतवाद्यांच्‍या मनोरंजनात लैला खान मग्‍न; राखी सावंतच्‍या भावाचीही चौकशी