आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukhtar Ansari And Vijai Mishra Seen In Pranabs Lunch Party

प्रणव मुखर्जी यांना दिलेल्या पार्टीत कैदी आमदारांचाही सहभाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - राष्ट्रपतीपदासाठी असलेले यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्या सन्मानार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिलेल्या भोजन समारंभात कायद्याचा भंग झाला आहे. लखनौ येथील कालिदास मार्गावरील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभात समाजवादी पक्षाचे सर्व आमदार आणि मंत्री यांच्यासोबत प्रणव मुखर्जी यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. परंतु त्याठिकाणी कौमी एकता दलाचे आमदार मुख्तार अन्सारी आणि समाजवादी पक्षाचे विद्रोही आमदार विजय मिश्रा यांच्या उपस्थितीने सर्वजण चकित झाले.
मुख्तार अन्सारी मागील सात वर्षांपासून, आणि विजय मिश्रा ३ वर्षांपासून कारागृहात आहेत. इतर आरोपांव्यतिरिक्त मुख्तार अन्सारी यांच्यावर भाजपचे आमदार कृष्णानंद रॉय यांच्या हत्येचा आरोप आहे. विजय मिश्र यांच्यावर ३० वेग-वेगळे खटले सुरु आहेत.
परंतु आज या दोघांना मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानी पाहण्यात आले. नियमांनुसार कारागृहात बंद असलेले आमदार फक्त विधानसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. याव्यतिरिक्त त्यांना कोठेही जाण्याची परवनागी नसते.
अखिलेश यादव यांचा 'कार'नामा, आमदारांना 20 लाखांपर्यंत गाडी घेण्‍यास मंजूरी
(फाईल फोटो - एका कार्यक्रमात मुख्तार अन्सारी यांच्यासोबत अखिलेश यादव)