आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Terror Attack Accused Arrested At Delhi Airport

मुंबई हल्‍ल्‍याचा आरोपी जबीउद्दीनला बीडमध्‍येच मिळाले दहशतवादाचे बाळकडू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यातील एक आरोपी रियासत अली उर्फ सैय्यद जबीउद्दीन याला अटक करण्‍यात आली आहे. दिल्‍ली पोलिसांच्‍या विशेष शाखेने ही कारवाई केली. रियासत अलीची अबू हमजा अशीही ओळख आहे. त्‍याला दिल्‍लीच्‍या विमानतळावरुन अटक करण्‍यात आली. रियासत अलीचे इंडियन मुजाहीदीन आणि लष्‍कर-ए-तैयबा या दशहवादी संघटनेशी संबंध आहेत.
रियासत अलीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्‍यात आली होती. गेल्‍या तीन वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणा त्‍याच्‍या मागावर होता. मुंबईवर 26 नोव्‍हेंबर 2008 रोजी झालेल्‍या हल्‍ल्‍यात रियासत अलीनेच 10 हल्‍लेखोरांना सुचना दिल्‍या होत्‍या. या हल्‍ल्‍यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याला रियासत अलीनेच हिंदीचे प्रशिक्षण दिले होते. कसाबच्‍या जबाबामध्‍येही प्रशिक्षण देणा-याचा उल्‍लेख आहे. सॅटेलाईट फोनवरुन हल्‍लेखोरांना सूचना देणारा आवाज कोणाचा, हा मोठा प्रश्‍न तपास यंत्रणांना होता. तो आवाज याचाच होता आणि अखेर त्‍याला पकडण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्राशी संबंध
जबीउद्दीन उर्फ रियासत अली हा मुळचा बीड जिल्‍ह्यातील गेवराई येथील रहिवासी आहे. औरंगाबादजवळ वेरुळ येथुन काही वर्षांपूर्वी एके 47 रायफल्‍स आणि शस्‍त्रसाठा जप्‍त करण्‍यात आला होता. हा साठा जबीउद्दीननेच ठेवला होता. बीड शहरातील कागजी वेस भागात जबीउद्दीनचे कुटुंब सध्‍या वास्‍तव्‍यास आहे. त्‍याला ४ बहिणी आई-वडील असा परिवार आहे. गेवराईच्‍या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतून त्‍याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीड येथील बलभीम महाविद्य्ल्यात त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नवगण महाविद्यालयात एम.ए.च्या पहिल्या वर्षाला त्याने प्रवेश घेतला होता. २००३-२००४ पासून तो सिमीच्‍या संपर्कात आला. सिमीने त्‍याचे ब्रेनवॉश करुन दहतशतवादाकडे वळविले. त्‍यानंतर तो इंडिअन मुजाहिदीनसाठी काम करु लागला. मुंबई हल्‍ल्‍याच्‍यावेळी तो पाकिस्‍तानातूनच हल्‍लेखोरांना सूचना देत होता.
मुंबईवर 26 नोव्‍हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्‍ला झाला होता. त्‍यात 166 जणांचा मृत्‍यू झाला होता. हल्‍लेखोर दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हाच जिवंत हाती लागला. त्‍याला सर्वोच्‍च न्‍यायालयाने फाशी ठोठावली असून राष्‍ट्रपतींकडे त्‍याचा दयेचा अर्ज प्रलंबित आहे.
मुंबई, दिल्लीत बसणार क्षेपणास्त्रविरोधी कवच
मुंबई स्फोटाचे कनेक्शन जम्मू काश्मिर पोलिसांपर्यंत
कसाब म्हणतो, मुंबईवरील 26/11चा कट पाकमध्येच