आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi As Pm Unacceptable, Indicates Nitish Kumar

पंतप्रधानपदासाठी धर्मनिरपेक्ष नेत्यानेच दावा करावा : नितीश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्‍ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर करण्यावरून राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीतील मतभेद मिटत नाहीत तोच बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाचा मुद्दा पुढे केला आहे. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीने धर्मनिरपेक्ष व्यक्तीचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. कुमार यांच्या आवाहनाला भाजप नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नितीश यांनी म्हटले आहे की, मी स्वप्नातही पंतप्रधानपदाचा विचार करत नाही. मोठ्या पक्षाचाच पंतप्रधान असायला हवा. सहकारी पक्षांची जी भूमिका असेल तीच संयुक्त जनता दलाची असेल. नितीश यांचे हे आवाहन नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी असल्याचे मानले जात आहे. प्रत्येक वेळी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे नाव जाहीर करण्याची रालोआची परंपरा आहे. 1996 व 1998 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार वाजपेयी होते. 1999 व 2004 मध्येही तेच मैदानात होते. 2009 मध्ये लालकृष्ण अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते, असे नितीश यांनी म्हटले आहे. शिवसेनेनेही त्यांना पाठिंबा दिला आहे.
आताच का बोलले?
० राष्‍ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव वाढवणे. ० जोशी प्रकरणानंतर मोदींचा भाजपमध्ये वाढता प्रभाव थोपवणे. ०रालोआकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींची वाढती दावेदारी.
मोदींविरुद्ध नितीश
० 2009 च्या निवडणुकीत नितीश यांनी मोदींना बिहारमध्ये प्रचारास येऊ दिले नव्हते.
० 2010 मध्ये पूरग्रस्तांना मोदींनी दिलेली मदत नितीश यांनी नाकारली.
० बिहारला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सूरतमध्ये आयोजित समारंभात मोदींनी नितीश यांचे नावही घेतले नाही.
धडक वक्तव्ये आणि नरेंद्र मोदींवर तीर!
म्हणाले : पंतप्रधानपदासाठी 2014 च्या निवडणुकीत रालोआचा उमेदवार सर्व घटक पक्षांना मान्य असावा.
उद्देश : भाजपकडून या पदासाठी मोदी प्रमुख दावेदार आहेत. मात्र, संयुक्त जनता दलाला ते मान्य नाही.
म्हणाले : उमेदवार धर्मनिरपेक्ष हवा. तो लोकतांत्रिक मूल्यांना मानणारा असावा.
उद्देश : मोदी यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववाद्याची आहे. 2002 मध्ये
गुजरात दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
म्हणाले : त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना सोबत घेऊन जाणारे असायला हवे.
उद्देश : मोदी यांनी संजय जोशींना पक्षातून घालवले. गुजरातेत अनेक भाजप नेत्यांना डावलले.
म्हणाले : तो केवळ विकसित राज्यांचा विचार करणारा नसावा. बिहारसारख्या मागास राज्यांचाही त्याने विचार करावा.
उद्देश : बिहारमध्ये जातीयवादी राजकारणामुळे विकास खुंटला असल्याचे मोदी म्हणाले होते.
बोल इंडिया बोल : मोदी - नितीशकुमार वाद, कोण ठरणार वरचढ
नवे गणित - मोदी-केशुभाई वाद अभ्यासक्रमातही