आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणांमुळे मोदी भाजपात आहेत सर्वांपेक्षा वरचढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी काय आहेत, कसे आहेत याविषयी नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे काही लोकांना मोदी आवडत असतील तर काहींची त्यांना नापसंतीही असेल. असे असले तरी, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. खुद्द मोदींनाही याची पूरेपूर जाणीव आहे. मीडियापासून थोडे अलिप्त राहाणारे मोदी गेल्या लोकसभा निवडणूकी दरम्यान स्वतःला दिल्लीच्या तोडीचे मानत नसेल तरी, आता समीकरणे बदलली आहेत. गांधीनगर ते दिल्ली प्रवास थोडा कठीण असला तरी, अवघड मात्र नाही. मोदी याबाबत स्पष्ट बोलत नसले आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीपासून स्वतःला दूर ठेवत असले तरीही, सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षात त्यांच्या तोडीचा एकही उमेदवार नाही.
इंदिरा गांधीवर हल्ला अर्थात दिल्ली दूर नाही
नरेंद्र मोदी कधीही लहान-सहान नेत्यांना निशाणा बनवत नाहीत. त्यांची तोफ धडाडते ती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर. राहुल गांधी पासून सोनिया गांधीपर्यंत त्यांनी सगळ्यांवर तोंडसुख घेतले आहे. नुकेताच त्यांनी इंदिरा गांधींवर हल्ला केला. ही मोदींची खेळी ठरवून असल्याचेच जाणवत आहे. ते आता फार पुढे गेले आहेत. तिथून आता मागे फिरण्याचा प्रश्नच नाही. कारण, त्यांना माहित आहे की आपले वक्तव्य आता नॅशनल इश्यू ठरतो.

प्रथम वाजपेयींचा आशीर्वाद, नंतर अडवाणींची भेट
मोदी दिल्लीत आल्यानंतर प्रथम ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेत असतात. मात्र यावेळी त्यांनी प्रथम पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर अडवाणींची भेट घेतली. यावरुन त्यांनी स्पष्ट संकेत दिले की, मोदी जर कोणापुढे झुकत असतील तर ते फक्त वाजपेयींसमोर.

सहका-यांच्या शोधात मोदी
नरेंद्र मोदी यांना पूर्ण कल्पना आहे की, २०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी युती आणि आघाडीचेच राजकारण करावे लागणार आहे. त्यामुळेच मोदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता असतील किंवा, ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि पंजाबचे प्रकाशसिंग बादल. मोदी या सर्वांशीच आता मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगत आहेत. याचे आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास एप्रिलमध्ये केंद्र सरकाने जेव्हा एनसीटीसी संदर्भात मुख्यंमंत्र्यांची बैठक बोलावली होती त्यात मोदींनी जयललिता आणि पटनायक यांच्या खांद्याला खांदा लावून त्याला विरोध केला होता आणि पंजाबात बादल यांच्या शपथग्रहण समारंभालाही हजेरी लावली होती. दुसरीकडे महाराष्ट्रतील भाजपचा मित्रपक्ष शिवसेनादेखील मोदींच्या प्रेमात आहे. पंतप्रधान पदासाठी शिवसेनेची पहिली पसंती मोदींनाच आहे. तर, मायावती आणि ममता बॅनर्जी यांचे मनवळवणे देखील त्यांना फार अवघड वाटत नाही.

जनता आणि कार्यकर्त्यांमध्येही मोदी लोकप्रिय
मतदारांची पसंती देखील मोदींनाच आहे, ही गोष्ट देखील नाकारुन चालणार नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वाधिक प्रसिद्धीचा झोत हा मोदींवरच असतो. अशी प्रसिद्धी पक्षातील इतर कोणत्याही नेत्याला मिळताना दिसत नाही. मीडियापासून सर्वसामान्य कार्यकर्ते मोदींमागे धावतांना दिसतात, मात्र ते सर्वांशीच सुरक्षीत अंतर ठेवून राहातात. पश्चिम बंगाल पासून राजस्थानपर्यंत मोदींचे चाहते आहेत. कारण ते दहशतवादावर बोलतात, हिंदूत्वावर त्यांची भाषा अत्यंत कडवड होते. एका विशिष्ट संप्रदायाचा ते नेहमीच तुच्छतेन उल्लेख करतात. त्यामुळे देशातील एक मोठा वर्ग त्यांचा चाहता आहे. असे असतांना त्यांचा द्वेष करणारे देखील कमी नाहीत, हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
मोदींना आव्हान, नरेंद्र मोदी- संजय जोशी संघर्ष पेटणार?
पंतप्रधानांचे ईशान्य राज्यांकडे दुर्लक्ष: मोदी यांचे टीकास्‍त्र
मोदी राजवटीपेक्षा आणीबाणी बरी!
नरेंद्र मोदी की आडवाणी?