आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र मोदी आत्महत्या करणार होते- केशूभाई पटेलांचा खळबळजनक दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- गुजरातमधील बडे प्रस्थ व माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. केशूभाई यांनी मोदींच्या विरोधात मागील काही दिवसापासून मोर्चा खोलला असून आता त्यांनी इंटरनेट व ब्लॉगचा आधार घेतला आहे. त्यांनी आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये लिहले आहे की, सन १९९८ ते २००१ या दरम्यान दिल्लीत आडवाणी यांच्या बंगल्यावर उपोषण करीत आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. या जोरावरच पुढे ते मुख्यमंत्री बनले.
ते पुढे लिहतात, मोदींचे आणि माझे काही शत्रूत्त्व नाही. मला सत्तेचा लोभ नाही. पण त्यांच्या कार्यकाळात जी विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मला मोदींच्या विरोधात मोर्चा खोलावा लागला आहे.
मी राजकारणात मागील ६८ वर्षापासून आहे. दुस-या महायुद्धापासून व ब्रिटिश कालखंडापासून मी आरएसएसचा स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी गुजरातसाठी खूप काही सोसले आहे. गुजरातसाठी मी रक्त-पाणी एक केले, अनेक सत्याग्रहात सामील झालो. पोलिसांच्या काट्या झेलल्या, तुरुगांत गेलो त्यामुळेच गुजरातमध्ये १९९५मध्ये भाजपाची सत्ता आली व आज जो भाजपाचा वटवृक्ष उभा राहिला आहे तो माझ्यामुळेच. पक्षानेही मला भरपूर दिले आहे. ६ वेळा आमदार, दोन वेळा मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्रीपद, लोकसभा व राज्यसभेत पाठविले. माझ्यावर भाजपने कायमच विश्वास ठेवला त्याबद्दल पक्षाची मी आभारी आहे.
गुजरातचा विकास हा वरवरचा असून नरेंद्र मोदींनी खोटा गवगवा केला असल्याचे सांगत त्यांनी काही उदाहरणे सांगितली. ती अशी-
- गुजरातमधील बीपीएल धारकांची संख्या ३९ टक्क्यांनी वाढली.
- आदिवासी टापूत ७० टक्के लोक गरीब आहेत.
- बिहार, ओडिशा आणि छत्तीसगडपेक्षाही गुजरातचा जीडीपी कमी आहे.
- इंडियन ह्युमन डेवलपमेंटमध्ये गुजरातचा ११ वा क्रमांक.
- सरकारी आकड्यानुसार, गुजरातमध्ये १० लाख युवक बेरोजगार.
- गुजरातवर १.२५ लाख कोटींचे कर्ज.
\'नरेंद्र मोदी हे सडलेले फळ, या गेंडयाला बाहेर फेका\'