आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasik Police Academy Was On Jabiuddin Ansari Target

जबीने केली होती नाशिक शहराची रेकी, पोलिस अकादमी होते लक्ष्‍य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः 26/11च्‍या हल्‍ल्‍याप्रकरणातील प्रमुख सुत्रधार जबीउद्दीन अन्‍सारी उर्फ अबू जुंदल याच्‍या निशाण्‍यावर नाशिकची पोलिस अकादमी होती, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. जबीने चौकशीदरम्‍यान ही माहिती दिली आहे. जबी नाशिकच्‍या अकादमीवर हल्‍ला करण्‍याचा कट रचत होता. तसेच 26/11च्‍या हल्‍ल्यापूर्वी डेव्‍हीड कोलमन हेडली यालाही भेटला होता.
जबीने दिलेल्‍या माहितीनुसार लाहोरमध्‍ये पोलिस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्‍या हल्‍ल्‍याचा बदला घेण्‍यासाठी नाशिकच्‍या अकादमीवर हल्‍ला करण्‍याचा कट होता. गेल्‍यावर्षी लाहोरमध्‍ये हल्‍ला झाला होता. त्‍याचा बदला घेण्‍यासाठी नाशिकमध्‍ये हल्‍ला करण्‍याची योजना होता. जबीने नाशिकमध्‍ये राहून शहराची रेकी केली होती. काही वर्षांपूर्वी त्रंबकेश्‍वर येथे शस्‍त्रास्‍त्रांचा मोठा साठा जप्‍त करण्‍यात आला होता. त्‍याप्रकरणी नाशिक पोलिसांनाही जबीचा ताबा हवा आहे.
जबीला पाकिस्‍तानने दिला पासपोर्ट
जबीउद्दीन हा पाकिस्‍तानी नागरिक असल्‍याचे दाखविण्‍यासाठी त्‍याला एक राष्‍ट्रीय ओळखपत्र देण्‍यात आले हाते. रियासत अली या नावाने हे ओळखपत्र होते. याच नावाने त्‍याला पासपोर्टही देण्‍यात आला होता. त्‍याच आधारे तो सौदी अरबमध्‍ये गेला होता. त्‍याला अटक करण्‍यात आली त्‍यावेळी‍ रियासत अली याच नावाने माहिती देण्‍यात आली होती. डीएनए चाचणी केल्‍यानंतरच खरी ओळख पटविण्‍यात आली. त्‍यानंतर त्‍याचा ताबा भारताला मिळाला होता. त्‍यामुळे तो पाकिस्‍तानात नव्‍हता आणि त्‍याला पाकिस्‍तानने पासपोर्ट दिला नव्‍हता, हा दावा खोटा ठरला आहे.पाकचे परराष्‍ट्र सचिव भारतात
पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र सचिव जलील अब्‍बास जिलानी हे भारत-पाक सचिव स्‍तरावरील द्विपक्षीय चर्चेसाठी आज दुपारी नवी दिल्‍लीत दाखल झाले आहेत. उद्यापासून दोन दिवसीय चर्चेला सुरुवात होणार आहे. त्‍यात अबू जुंदल उर्फ जबीउद्दीन अन्‍सारीचा मुद्दा चर्चेला येणार आहे. पाकिस्‍तानने भारतावर मुंबई हल्‍ल्‍याप्रकरणी सविस्‍तर माहिती दिलेली नाही, असा आरोप केला होता. तसेच मुंबई हल्‍ल्‍यात 40 भारतीयांचा सहभाग असल्‍याचा दावाही केला होता. भारताने मात्र पाकिस्‍तानचे दावे खोडून काढले आहेत.
26/11 च्या हल्ल्यावेळी जबीउद्दीनसोबत होता हाफिज सईद
जबी प्रकरण : ‘एटीएस’ची चार शहरांवर नजर!
जबीने नेपाळमध्‍ये लष्‍करच्‍या दहशतवादी शिबिरात घेतले प्रशिक्षण