आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Opposes P A Sangma As Presidential Candidate

संगमांच्‍या नावाला राष्‍ट्रवादीचा पाठींबा नाहीः शरद पवारांनी स्‍पष्‍ट केली भूमिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः राष्‍ट्रपती पदाच्‍या शर्यतीत उतरलेले लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांना स्‍वतःचाच पक्ष राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने पाठींबा देण्‍यास नकार दिला आहे. संगमा यांनी आज राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी संगमा यांना स्‍पष्‍ट शब्‍दात नकार दिला. बिजू जनता दल आणि अण्णा द्रमुक या पक्षांनी संगमा यांना पाठीबा देण्‍याचे जाहिर केले होते. परंतु, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस हा संयुक्त पुरोगामी सरकारमधील घटकपक्ष असून यासंदर्भात युपीएपेक्षा स्‍वतंत्र भूमिका पक्षाची राहणार नाही, असे शरद पवार यांनी स्‍पष्‍ट केले.
संगमा यांनी आज सकाळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. संगमा यांनी सुचविलेल्या पर्यायांवर विचार केला जाईल, असे आश्‍वासन पवार यांनी दिले आहे. आदिवासी व्यक्ती भारताचा राष्ट्रपती व्हावा, यासाठी स्थापन झालेल्या मंडळाचा भाग असल्याने निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे संगमा यांनी पवारांना सांगितले. दरम्‍यान, निवडणुकीत उतरल्‍यावरुन पवार यांनी संगमा यांना फटकारल्‍याचेही वृ्त्त आले होते. परंतु, संगमा यांनी असे काहीच घडले नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. आदिवासी व्‍यक्तीला आगामी राष्‍ट्रपतीपद मिळावे, यासाठी वेगवेगळ्या पक्षांचा पाठींबा मिळण्‍याकरीता प्रयत्‍नशील असल्‍याचे संगमा यांनी सांगितले. त्‍यांच्‍याव्‍यतिरिक्त लोकसभेचे उप सभापती करिया मुंडा (भाजप), केंद्रीय मंत्री के. सी. देव (कॉंग्रेस), नागालॅंडचे माजी मुख्‍यमंत्री आणि महाराष्‍ट्राचे माजी राज्‍यपाल एस. सी. जमीर (कॉंग्रेस), इत्‍यादी नेते या शर्यतीत असल्‍याचे संगमा यांनी सांगितले.
राष्ट्रपती निवडणूक : बीजेडी, जयललितांचा संगमा यांना पाठिंबा