आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Night with friends to get involved in the student teacher in love with the gang

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकाने मित्रांच्‍या मदतीने विद्यार्थिनीवर केला सामुहिक बलात्‍कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- जोधपूरमध्‍ये गुरू शिष्‍याच्‍या नात्‍याला काळीमा फासणारा प्रकार समोर आल्‍याने खळबळ माजली आहे. एका शिक्षकाने आपल्‍याच विद्यार्थिनीला प्रेमाच्‍या जाळयात ओढून तिच्‍यावर बलात्‍कार केला. इतक्‍यावरच न थांबता या नराधम शिक्षकाच्‍या चार मित्रांनीही त्‍या पीडित मुलीवर रात्रभर अत्‍याचार केल्‍याचे प्रकरण समोर आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, ही घटना 26 एप्रिल रोजी घडली. परंतु, सोमवारी पीडित कुटुंबियाने सिरियारी पोलिस ठाण्‍यात याची माहिती दिली. आरोपीने या घटनेबाबत कुणाला माहिती दिल्‍यास मुलीला जीवे मारण्‍याची धमकी दिली होती. आरोपीच्‍या धमकीमुळे आणि समाजात नाचक्‍की होईल या भीतीमुळे तक्रार दाखल करण्‍यास उशिर झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
आरोपी शिक्षक नरेंद्रसिंह राजपूत हा बाडिया गावाचा रहिवासी असून, त्‍याचा साथीदार गोटूसिंह उर्फ गोविंदसिंह, भगवानसिंह राजपूत, प्रदीपसिंह राजपूत आणि जयपूरचा सागरसिंह शेखावत यांच्‍याविरोधत अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करणे आणि बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. आरोपी सागरसिंह शेखावतची आई पीडित मुलीच्‍या शाळेत शिक्षिका आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिस त्‍यांच्‍या शोधात आहेत.
पोलिस ठाण्‍यातच तरुणीवर बलात्कार; बाहेर पहारा देण्यात पोलिस होते गुंग!