आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल इंडिया बोल : मोदी - नितीशकुमार वाद, कोण ठरणार वरचढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकांना अजून दोन वर्ष बाकी आहेत. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आतापासूनच पंतप्रधानपदासाठी अहमहमिका सूरु झाली आहे.
एकीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून देशभर शक्ती प्रदर्शन करत आहेत तर, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांनीही या पदावर दावा केला आहे. त्‍यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून घोषित करण्‍यात येणा-या उमेदवारासंदर्भात पाच अटी ठेवल्‍या आहेत. त्‍यामुळे मोदी आणि नितीशकुमार या दोन नेत्‍यांमध्‍ये दुरावा आणखी वाढला आहे.
नितीशकुमार यांच्या अटींमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येच मतभेदाचे वातावरण तयार झाले. यानंतर शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत ज्याप्रमाणे एनडीएच्या विरोधात भूमिका घेत प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला तसेच, पंतप्रधानपदासाठीही त्यांनी नितीशकुमार यांना समर्थन दिले आहे, तर भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांच्यावर टीका केली.
नितीश यांनी कोणाचेही नाव भलेही घेतले नसले तरी, 'धर्मनिरपेक्ष' उमेदवार असावा अशी अट घातली आहे. त्यामुळे चिडलेल्या मोदींनी नितीश यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. मोदींनी त्यासाठी ट्विटरची मदत घेतली. मोदींनी ट्विट केले की, "चारित्र्यातून इच्छा निर्माण होतात आणि कर्म हे चारित्र्य घडवते. जसे कर्म असेल तशा इच्छा असणारच."
शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव निवडणूकीआधीच जाहीर करण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत म्हणाले, एनडीए मधील सर्वात मोठा पक्ष या नात्याने भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची अँडव्हान्समध्ये घोषणा केली पाहिजे.
तर, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नितीशकुमार यांच्या सरकारमधील मंत्री गिरिराज सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधतांना म्हटले की, पक्षातून कोणीही पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ शकतो.आपले मत : नितीशकुमार आणि मोदी यांच्यातील वाद काही नवा नाही. मात्र तुमच्या दृष्टीने या वादाचे खरे कारण काय असेल ? सार्वत्रिक निवडणूका २०१४ मध्ये होणार आहेत. तेव्हा आताच पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा करणे संयुक्तिक आहे का ? एनडीएच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी नितीश यांनी अटी ठेवणे योग्य आहे का ? या वादाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फायदा होईल की नुकसान ? तुम्ही तुमचे मत खाली दिलेल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये नोंदवू शकता.
नितीशकुमारांचा पुन्‍हा मोदींवर निशाणा: पंतप्रधानपदावरुनही एनडीएमध्‍ये दुफळी
नितीशकुमार, शरद यादवांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानपद ही कोणत्याही परिवाराची जहागिरी बनू नये- अडवाणी