आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणव मुखर्जींचा उमेदवारी अर्ज मंजूर, संगमांचा दावा फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- प्रणव मुखर्जी यांचा राष्‍ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांनी स्विकारला आहे. मुखर्जींचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी करणारा पी. ए. संगमा यांचा अर्ज फेटाळण्‍यात आला. अधिका-यांनी संगमा यांचाही अर्ज आज स्विकारला.
भारतीय सांख्यिकी संस्‍थेचे (आयएसआय) अध्‍यक्षपद प्रणव मुखर्जी यांच्‍याकडे आहे. हे लाभाचे पद असल्‍यामुळे मुखर्जी यांचा अर्ज रद्द करण्‍यात यावा, अशी मागणी संगमा यांनी केली होती. परंतु, आयएसआयच्‍या अध्यक्षपदाचा राजीनामा 20 जून रोजीच दिला होता, असे लेखी उत्तर प्रणव मुखर्जी यांनी दिले होते. आयएएसआयनेही यासंदर्भात कालच स्‍पष्‍टीकरण दिले होते. मुखर्जी यांचा हा खुलासा निवडणूक निर्णय अधिका-यांनी मान्‍य केला.
प्रणव मुखर्जींबद्दल सांख्यिकी संस्‍थेकडून चुकीची माहिती?
प्रणव मुखर्जींना संगमांचे आव्हान, चर्चा करा
पूर्णो संगमा : हरणार नक्की, तरीही रिंगणात
अ-पूर्णो संगमा ! (अग्रलेख)