आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात वीज पूरवठा ठप्प, जनता खोळंबली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टीम अण्णाचे सदस्य संजय सिंह यांनी जंतर-मंतर येथे दावा केला की, नॉर्दन ग्रीडमधील बिघाड, हे केंद्र सरकारने घडवून आणलेले कारस्थान आहे. टीम अण्णाचे आंदोलन थोपवण्याचा हा कट आहे. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक वीज पुरवठा खंडीत केला आहे. जनता अण्णांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी केलेले हे कारस्थान आहे. कुमार विश्वास म्हणाले, वीज पुरवठा खंडीत झाल्याने रेल्वे आणि मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. लोक आंदोलनाकडे फिरकू नयेत यासाठीच हे करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ६० टक्के वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून पुढील दोन तासात उर्वरित भागातही वीज पुरवठा सुरु होईल. सोमवारी ११ च्या सुमारास आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री म्हणाले, अशा घटना या कधीतरी होत असतात. जवळपास १० वर्षानंतर अशी घटना घडली आहे. मात्र, असे का घडले याचा उलगडा त्यांनी केला नाही.
शिंदे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी जेव्हा मध्यरात्री ग्रीडमध्ये बिघाड झाला होता तेव्हा दुस-या दिवशी चार वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता. यावेळी मात्र सकाळी साडे आठ वाजता अनेक भागात वीज पुरवठा पुर्ववत करण्यात यश आले आहे. ते म्हणाले, इस्टर्न आणि वेस्टर्न ग्रीडवरुन वीज घेण्यात आली आहे आणि परिस्थिती पुर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
रविवारी रात्री अडीच वाजेपासून उत्तर भारतातील ९ राज्यातील वीज पुरवठा ठप्प आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, चंदीगड, जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली येथे वीजेचे संकट निर्माण झाले आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी दिलेल्या माहितीनूसार आग्रा शहराजवळ असलेल्या नॉर्दन ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला आहे.
सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास काही शहरांमध्ये वीज पुरवठा सुरु करण्याता आला आहे. त्यात जयपूर, रोहतक, चंदीगडचा काही भाग, लखनऊ आणि वाराणसी यांचा समावेश आहे. दिल्ली ट्रांस्कोचे जनसंपर्क अधिकारी ऋषिराज म्हणाले, दिल्लीतिल ६० टक्के भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
एनटीपीसीच्या अधिका-यांचे म्हणणे आहे की, नॉर्दन ग्रीड मधील तांत्रिक बिघाड दुपारी दोन पर्यंत दुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच वीज पुरवठा सुरळीत होईल.
वीजेआभावी उत्तर भारतातील अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. दिल्लीतील ६ जलशुद्धीकरण केंद्रापैकी ३ ठप्प झाले आहेत. मेट्रोच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनूसार दिल्ली- एनसीआर मेट्रो प्रभावित झाली आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास २५ टक्के मेट्रोसेवा सुरु करण्यात आली असून ९ पर्यंत ६० टक्के सेवा सुरु होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागणार आहे. रस्त्यावरील सिग्नल यंत्रणाही बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दिल्लीच्या अतिमहत्त्वाच्या भागात ३०० मेगावॉट पुरवठा दिला गेला आहे. दिल्लीत जवळपास ३५००-४००० मेगावॉट वीजेची अवश्यकता असते.
10 रुपयांच्या रिचार्जवर गावात 9 तास अखंड वीज
कचर्‍यापासून वीज: प्रकल्पासाठी चारही दिशांना जागा घेण्याची सूचना
ग्राहकांना वीज बिलाचा शॉक लगा, लगा, लगा