आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्‍ली उच्‍च न्‍यायालय बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी आणखी एकाला किश्‍तवाडमधून अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू/नवी दिल्‍ली- गेल्या वर्षी सात सप्टेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने आज किश्‍तवाड जिल्ह्यातून एकाला अटक केली आहे. मोहम्मद अयूब असे त्‍याचे नाव असून, तो किश्‍तवाडमधील शीशा या गावचा रहिवासी आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार 'हिजबुल मुजाहिदीन'चा कमांडर मोहम्मद अमिन ऊर्फ जहांगिर रशिद याने वापरलेल्या मोबाईलमधील सिम कार्डची नोंद अयूबच्या नावावर असल्याचेही तपास संस्‍थेला आढळले आहे. यासंदर्भात अटक करण्‍यात आलेल्‍या वसिम अक्रम या वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍याच्‍या चौकशीदरम्‍यान अयुबचे नाव समोर आले होते. वसिमचे काका आणि चुलत भावालाही चौकशीसाठी दिल्‍ली पोलिसांनी बोलाविले होते. दिल्‍ली बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी जुनैद अक्रम मलिक या व्‍यक्तीचा किश्‍तवाडमध्‍ये कसून शोध घेण्‍यात येत आहे. एनआयए आणि स्‍थानिक पोलिसांकडून ही शोध मोहिम रा‍बविण्‍यात येत आहे. जुनैद हा वसिम अक्रमचा भाऊ आहे. अयूबला अधिक चौकशीसाठी नवी दिल्लीला नेण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान निवासाजवळ अतिरेकी हल्ला; महिलेसह 4 जखमी
बँकॉकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचे टार्गेट इस्रायली अधिकारीच