आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर 2012 च्या नामांकनासाठी भारतीय चित्रपटाची निवड सप्टेंबरअखेरपर्यंत

12 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चित्रपटसृष्टीतील सवरेत्कृष्ट पुरस्कार ऑस्कर 2012 साठी नामांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतातील एक चित्रपट नामांकनाच्या या स्पर्धेत उतरणार असून या चित्रपटाच्या निवडीची प्रक्रिया भारतातही सुरू झाली आहे. एफ.एफ.आय. अर्थात फिल्म फेडरेशन ऑफ इंडियातर्फे ऑस्करसाठी चित्रपट निवडला जातो. एफ.एफ.आय. ने यावेळी आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
या संघटनेचे सचिव सुपर्ण सेन यांनी सांगितले की, भारतातील काही चित्रपट संस्थांकडून ऑस्करला जाण्यायोग्य चित्रपटाची नावे मागवण्यात आली आहेत. त्याशिवाय कोणत्याही भारतीय भाषेतील चित्रपटासाठी एखादा चित्रपट निर्माता एफ.एफ.आय.कडे अर्ज करू शकतो. सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणत्याही एका चित्रपटाला ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत नामांकनासाठी पाठवण्यात येणार आहे.
देशभरातून यावेळी कमीत कमी 25 चित्रपट या नामांकनाच्या स्पर्धेत उतरतील. मागील वर्षी 27 चित्रपटांतून पिपली लाइव्हला भारतातर्फे ऑस्करच्या स्पर्धेत पाठवण्यात आले होते.

11 ते 17 सदस्यांची ज्युरी एफ.एफ.आय.चे पारडे हिंदीच्या बाजूने झुकल्याचा आरोप
एफ.एफ.आय.चे सचिव सुपर्ण सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ऑस्कर पुरस्कार निवडण्यासाठी कमीत कमी 11 ते जास्तीत जास्त 17 सदस्यांची ज्युरी असेल. तसेच यावेळी ज्युरी अर्थात पुरस्कारासाठी चित्रपटाची निवड करणारे सदस्य हे काळजीपूर्वक निवडले जात आहेत. कोणत्याही सदस्य्याचा स्पर्धेतील कोणत्याही चित्रपटाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसावा, याबाबत खबरदारी घेतली जात आहे.
एफ.एफ.आय. चे पारडे हिंदी चित्रपटांकडे जास्त झुकल्याचा आरोप संघटनेवर केला जातो. तसेच प्रदेशांच्या सीमांनुसारही चित्रपटांची निवड करण्यात येते, असाही आरोप केला जातो. भारताक़डून गेल्या काही वर्षात पाठवण्यात आलेल्या सहा चित्रपटांपैकी 5 चित्रपट हिंदी होते. यात पिपली लाइव्ह, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तारे जमीं पर, एकलव्य, रंग दे बसंती यांचा समावेश होता. यापैकी पाच चित्रपट हिंदी भाषेतील आहेत. त्यामुळे विभागीय पातळीवरील चित्रपट प्रतिनिधींनाच समितीत विशेष स्थान मिळत आहे.आतापर्यंत भारताकडून 40 पेक्षा जास्त चित्रपट सवरेत्कृष्ट चित्रपट नामांकन र्शेणीकरिता ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहेत. पण त्यापैकी फक्त तीन चित्रपट (मदर तेरेसा-1957, सलाम बॉम्बे- 1988, आणि लगान-2001 ) स्पर्धेत उतरले. इतरांना ऑस्करच्या निवड समितीने नापसंती दर्शवली. दरम्यान यावेळी भारतीय नामांकनाच्या स्पर्धेत नील माधव यांचा बहुचर्चित ‘आय अँम कलाम’ हा चित्रपट उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत नामांकन झालेल्या चित्रपटाचे नाव जाहीर होईल.