आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामा राष्ट्राध्यक्ष बनू शकतात तर मी का नाही? - संगमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागलेले छुपे रुस्तम उमेदवार माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए.संगमा यांनी आपली तुलना अमेरिकेचे कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी केली आहे.
संगमा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यंदा आदिवासी राष्ट्रपती असावा असा संगमांचा आग्रह आहे.या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी त्यांना छेडले असता ते म्हणाले, आपल्या समोर बराक ओबामांचे उदाहरण आहे.
एक कृष्णवर्णीय व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होऊ शकेल असे कुणालाही वाटले नव्हते.पण असा व्यक्ती होऊ शकत असेल तर मग कुणी आदिवासी भारताचा राष्ट्रपती का होऊ शकणार नाही ? विशेष म्हणजे संगमांना त्यांच्या राष्ट्रवादी पक्षानेही पाठिंबा देण्यास इन्कार केला आहे.
वडिलांच्‍या प्रचारात सहभागी होऊ नकाः अगाथा संगमा यांना राष्‍ट्रवादीची तंबी
राष्‍ट्रपती निवडणुकीसाठी संगमा बंडाच्‍या पावित्र्यात
राष्ट्रपती निवडणूक : बीजेडी, जयललितांचा संगमा यांना पाठिंबा