आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रपती निवडणुकीसाठी संगमा बंडाच्‍या पावित्र्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः राष्ट्रपती पदासाठी आपल्याच पक्षातून होणाऱ्या विरोधानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. ए. संगमा बंडाच्‍या पावित्र्यात आहेत. गरज भासल्‍यास राष्ट्रपती पदाची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची तयारी संगमा यांनी दाखवली आहे. ते वृत्त वाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मात्र संगमा यांच्‍या नावाला विरोध केला होता. एवढेच नव्‍हे तर संगमा यांना या मुद्यावरुन फटकारल्‍याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.
राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत पी. ए. संगमा यांचे नाव पुढे आलं आहे. जयललिता आणि नवीन पटनायक यांनी संगमा यांना पाठिंबा व्यक्त केला. परंतु, पक्षातील काही नेत्यांनी संगमा यांच्या नावाला आक्षेप घेतला. शरद पवार यांनीही त्‍यांच्‍या नावाला मंजूरी दिलेली नाही. युपीएचा घटक पक्ष असल्‍यामुळे आघाडीने एकमताने ठरविलेल्‍या नेत्‍यालाच पाठींबा देऊ, असे पवार म्‍हणाले होते. याबद्दल विचारले असता संगमा म्हणाले, ‘मागे हटण्याचं काही कारणच नाही. मी जयललिता आणि नवीन पटनायक यांना निराश करणार नाही. याचा अर्थ आहे की, जर वेळ आली तर ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवीन.’
लोकसभेचे माजी अध्यक्ष संगमा यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासहीत अन्य काही नेत्यांना आपण भेटणार असल्याचे सांगितले. एका आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती पद मिळावे, यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. ‘जयललिता आणि नवीन पटनायक यांनी जाहिररित्या मला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि इतर राजकीय पक्षांकडूनही मला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे पाऊल मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संगमा यांनी भाकप नेते डी. राजा यांचीही नुकतीच भेट घेतली आहे. जयललिता यांनी आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि इतर काही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचेही नाव या शर्यतीमध्‍ये आहे. परंतु, त्‍यांना ममता बॅनर्जी यांनी विरोध केला आहे. तृणमूल कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्षा ममता बॅनर्जी यांनी मीरा कुमार, गोपाल गांधी किंवा ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांना समर्थन दिले आहे. प्रणव मुखर्जी यांच्‍यासंदर्भात विचारले असता त्‍या म्‍हणाल्‍या, हा कॉंग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. त्‍यासंदर्भात मी काही बोलू शकत नाही. मीरा कुमार, गोपाल गांधी किंवा कलाम हे राष्‍ट्रपती झाल्‍यास मला आनंद होईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
संगमांच्‍या नावाला राष्‍ट्रवादीचा पाठींबा नाहीः शरद पवारांनी स्‍पष्‍ट केली भूमिका
माझ्या उमेदवारीबाबत मीही तुमच्यासारखाच अंधारात- प्रणव मुखर्जी
राष्ट्रपती निवडणूक : बीजेडी, जयललितांचा संगमा यांना पाठिंबा
दिल्लीत जाताच राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत शरद पवारांचे घूमजाव