आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्या दयायाचिकेवर राष्ट्रपतीच निर्णय घेतील, असे गृहमंत्रालयाने आज स्पष्ट केले. संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज 10 वर्षे पूर्ण झाली. एवढ्या कालावधीनंतरही अफझल गुरूला फाशी का झाली नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला आहे. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेचे रक्षण करताना शहीद झालेल्या नऊ जवानांना आज संसद परिसरात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभा सभापती मीरा कुमार, भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नेत्यांनी शहिदांच्या प्रतिमांना श्रद्धासुमन अर्पण केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांत १ मिनिटाचे मौन पाळण्यात आले. भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीचा मुद्दा उपस्थित केला. ज्या दिवशी अफझलला फाशी दिली जाईल, त्याच दिवशी शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना प्रसाद यांनी व्यक्त केली.
अफझल गुरूची दयायाचिका राष्ट्रपतींकडे विचाराधीन आहे. त्या यावर निर्णय घेतील. निर्णय घेण्यासाठी त्यांच्यावर कोणतीही कालमर्यादा नाही, असे केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.