आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pinki Pramanik Is Male. Its Detect In Medical Check Up Kolkata

सुवर्ण पदक जिंकणारी अ‍ॅथलिट पिंकी महिला नसून पुरुष असल्याचे उघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता: आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी अ‍ॅथलिट पिंकी प्रामाणिक ही महिला नसून पुरुष असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बलात्‍काराच्‍या आरोपाखाली पिंकीला गुरुवारी अटक झाली होती. पश्‍चिम बंगालमधील परगणा जिल्‍ह्यातील बागुहटी पोलिस ठाण्‍यात पिंकीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंकीने गेल्या तीन वर्षांपासून अ‍ॅथलेटिक्समधून संन्यास घेतला होता. पिंकीवर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पिंकी महिला नसून पुरूष असल्याचेही पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे पिंकीने पीडित महिलेला लग्नाचे वचनही दिले होते. त्यानुसार पिंकीची नर्सिंग होममध्ये तपासणी करण्यात आली. त्यात पिंकी महिला नसून पुरूष असल्याचे स्पष्‍ट झाले आहे. पिंकीची पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयात तपासणी होणार आहे. त्यानंतरच तिला न्यायालयात हजर केले जाईल, असे चौकशी अधिकार्‍यांने सांगितले.
दरम्यान, अ‍ॅथलिट पिंकीने 4x400 मीटर स्‍पर्धेत चांगले प्रदर्शन केले होते. 2006 मधील राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत तिने रौप्‍य पदक पटकाविले. तसेच आशियाई क्रीडा स्‍पर्धेत सुवर्ण पदकावर स्वत:चे नाव कोरले होते. 2005 च्‍या इनडोअर आशियाई स्‍पर्धेत सुवर्ण पदक, 2006 मधील 400 मीटर दक्षिण आशियाई स्पर्धेत, 800 मीटर स्‍पर्धेत आणि रिले स्‍पर्धेत प्रत्येक एक- एक सुवर्ण पदक त‍िने जिंकले होते. पिंकीवरील गुन्हा सिद्ध झाल्यास तिचावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सूवर्ण पदक विजेत्‍या महिला अ‍ॅथलीटवर बलात्‍काराचा आरोप
जोगेश्वरीत नऊ वर्षाच्या मुलीवर तरूणाकडून बलात्कार
सलग सात वर्ष धमकावत वकिलाने केला बलात्कार